कायम साडीत दिसणारी ‘दयाबेन’चा असा लूक पाहून चाहते हैराण, अभिनेत्रीला ओळखणं कठीण

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘दयाबेन’चा हटके लूक,(look) कायम साडीत दिसणाऱ्या दिशा वकानीचा हैराण करणारा लूक… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा वकानी हिच्या लूकची चर्चा…

तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत कायम साडीत आणि साध्या लूकमध्ये दिसणारी दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी आता झगमगत्या विश्वापासून दूर आहे. अभिनेत्री दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता दिशा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या दिशा हिचा एक जुना व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ अभिनेत्राचा हटके आणि बोल्ड लूक पाहून चाहते देखील हैराण झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिशा निळ्या रंगाचा शिमरी टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांना देखील थक्का बलली आहे. कायम गुजराती साडी (look)आणि ज्वेलरीमध्ये दिसत असते. अशात अभिनेत्रीचा असा लूक पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. व्हायरल व्हिडीओबद्दल सांगायचं झालं तर, दिशाच्या म्यूझीक व्हिडीओचा आहे. ‘भिगरी गा..’ असं गाण्याचं नाव आहे.

दिशा वकानी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने रंगभूमीपासून सुरुवात केली. दिशा हिने गुजराती सिनेविश्वात देखील अनेक वर्ष काम केलं. 1997 मध्ये दिशा हिने मोठ्या पडद्यावर देखील काम केलं. पण अभिनेत्रीला यश मिळालं नाही. त्यानंतर दिशा हिला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत दिशा हिने ‘दयाबेन’ या भूमिकेला न्याय देत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता दिशाने मालिकेचा निरोप घेतला असला तरी, तिची चर्चा होत असते. 2017 मध्ये दिशा हिने कुटुंबासाठी मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर दिशा पुन्हा पदार्पण करणार अशी चर्चा होती. पण अखेर रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याची माहिती समोर आली.

दिशा वकानी हिचं खासगी आयुष्य…
दिशा वकानी हिने 2015 मध्ये 24 नोव्हेंब 2015 मध्ये लग्न केलं. अभिनेत्री उद्योजक मयूर पाडिया यांच्यासोबत कुटुंबियांच्या इच्छेने लग्न केलं. मयूर आणि दिशा यांना दोन मुलं आहेत. 2017 मध्ये दिशाने लेकीला जन्म दिला. त्यानंतर 2022 मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला. दिशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

हेही वाचा:

प्रियांका सांगणार वाघिणीची गोष्ट; देसी गर्लनं ‘टायगर’ ची रिलीज डेट केली जाहीर

सांगलीत नामांकीत उषःकाल हॉस्पिटलकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी? 3 जणांवर गुन्हा दाखल

इचलकरंजी महापालिकेचा सार्वजनिक नळ घरात! अधिकाऱ्याकडून कारवाईचा आदेश