प्रियांका सांगणार वाघिणीची गोष्ट; देसी गर्लनं ‘टायगर’ ची रिलीज डेट केली जाहीर

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने (release)वाट बघत असतात. अशताच आता प्रियांकानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रियांकाचा ‘टायगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत प्रियांकानं एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.

प्रियांका नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “‘टायगर’… एक कथा जी जंगलात घडणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर आणते, जसे की, प्रेम, संघर्ष, भूक आणि बरेच काही.”नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, “‘टायगर’… एक कथा जी जंगलात घडणाऱ्या सर्व गोष्टी बाहेर आणते, जसे की, प्रेम, संघर्ष, भूक आणि बरेच काही.”

“भारतातील जंगलात, जिथे लहान-मोठे, प्राणी फिरतात, तिथे अंबा राहते. (release)अंबा ही एक वाघीण आहे. ती आपल्या शावकांची इतक्या प्रेमाने काळजी घेते. या सुंदर कुटुंबावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचं शूटिंग 8 वर्षांहून अधिक काळ सुरु होतं. या अविश्वसनीय कथेला देताना आणि या चित्रपटाद्वारे जंगल एक्सप्लोर करताना मला खूप मजा आली.”, असंही प्रियांकानं पोस्टमध्ये लिहिलं. ‘टायगर’ हा चित्रपट या वसुंधरा दिनी म्हणजेच 22 एप्रिल रोजी डिज्नी नेचरवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा:

महायुतीत शिवसेना नाराज? भाजप मित्रपक्षांना संपवतंय, सर्व्हेच्या नावाखाली फसवतंय; शिंदेंच्या माजी मंत्र्याचा हल्लाबोल

इचलकरंजी महापालिकेचा सार्वजनिक नळ घरात! अधिकाऱ्याकडून कारवाईचा आदेश

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, पण मान्सूनविषयी ‘गुड न्यूज’