अनिल अंबानींच्या पावलावर पाऊल? मुकेश अंबानींना बसला ‘इतक्या’ हजार कोटींचा झटका!
काही वर्षांपूर्वी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले अनिल अंबानी(Business news) पुन्हा एकदा व्यवसायात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. रिलायन्स समूहातील कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अंबानी यांना अवघ्या पाच दिवसांत तब्बल ७५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अनिल अंबानी यांना एकेकाळी व्यवसायातील(Business news) ग्लॅमरस नाव म्हणून ओळखले जात होते. मात्र, कर्जाच्या बोजामुळे त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. एका क्षणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
परंतु, मुकेश अंबानी यांनी वेळीच मदत केल्याने हे संकट टळले. त्यानंतर अनिल अंबानी यांनी अनेक कंपन्यांचे कर्ज फेडले आणि सेबीकडून शेअर बाजारात पुन्हा प्रवेश करण्याची परवानगी मिळवली. मात्र, अल्पावधीतच त्यांच्या कंपनीचे शेअर्स घसरले. आता असाच काहीसा फटका मुकेश अंबानी यांना बसला आहे.
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजही याला अपवाद ठरली नाही. या घसरणीमुळे रिलायन्स कंपनीचे बाजार भांडवल तब्बल ७५ हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. केवळ रिलायन्सच नाही तर एलआयसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवलातही मोठी घसरण नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल १,२५,३९७.४५ कोटी रुपयांनी घटले.
सध्या फक्त रिलायन्स समूहाच्या नुकसानीबद्दल माहिती समोर आली आहे. इतर कंपन्यांच्या नुकसानीबद्दल, म्हणजे एलआयसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेच्या घसरणीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
धोकादायक कॉम्बिनेशन! चहासोबत सिगारेट ओढताय? मग आताच सावध व्हा!
गर्ल्स हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् विनाकारण मार खाऊन आला; मजनूचा Video Viral
Budget आधी मोदी सरकारचा मोठा निर्णय, १ एप्रिलपासून लागू होणार UPS