बँकेची काम आजच उरकून घ्या, सलग 4 दिवस बँका बंद राहणार

सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळे संपूर्ण महिन्यात 15 दिवस बँकांना(bank) सुट्ट्या राहणार आहे. अलीकडेच 14, 15 आणि 16 सप्टेंबरला सलग तीन दिवस बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर असे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत.

यामध्ये14 सप्टेंबर हा महिन्याचा दुसरा शनिवार होता, तर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँका(bank) बंद होत्या. याशिवाय सोमवारी ईद-ए-मिलादनिमित्त सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद होत्या. मात्र RBI देशभरातील बँकांच्या यादी एकत्रितपणे जाहीर करते. त्यानुसार देशभरात वेगवेगळ्या भागात पुढील चार दिवस बंद राहणार आहे.

RBI ने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये 20 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी निमित्त जम्मू आणि श्रीनगरच्या सर्व बँकांमध्ये सुट्टी असेल. त्याचवेळी, शनिवार, 21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिनामुळे केरळमधील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही, तर रविवार, 22 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी आहे.

मात्र बँका जरी बंद असल्या तरी देखील बँकेशी संबंधित कोणत्याही कामासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग वापरू शकता. याशिवाय, तुम्ही UPI द्वारे व्यवहार करू शकता, तर तुम्ही ATM द्वारे पैसे काढू शकता.

20 सप्टेंबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (शुक्रवार) जम्मू आणि श्रीनगर
21 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) – केरळ
22 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत
23 सप्टेंबर – शूरवीरांचा हुतात्मा दिवस (सोमवार) – हरियाणा आणि महाराजा हरिसिंह जी (जम्मू आणि श्रीनगर) यांचा जन्मदिवस.

हेही वाचा:

Zomato ला मोठा झटका! कंपनीला 177000000 कोटींची नोटीस

हातगाडी लावण्यावरून कोल्हापुरात एकाला भोसकलं; चाकूने सपासप वार

‘हे माझं मंदिर…’अरिजित सिंहच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, स्टेजवर घडला विचित्र प्रकार Watch Video