प्रेयसी 4-5 दिवस बोलली नाही, नैराश्यात गेलेल्या तरुणाने केलं भयंकर कृत्य

रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणातून एका तरुणाने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेयसी(Girlfriend ) बोलत नाही म्हणून तरुणाने विष प्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

तरुणाने विष प्राशन केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे घडली आहे. सोहम राजाराम पवार असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेयसी बोलत नसल्याच्या नसल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्यू केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोहमची प्रेयसी(Girlfriend ) चार-पाच दिवस त्याच्याशी बोलत नव्हती. या नैराश्येतून त्याने बुधवारी विष प्राशन केलं. सोहमला अस्वस्थ वाटू लागल्याने देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची नोंद देवरुख पोलिस स्थानकात करण्यात आली असून याबाबत अधिक तपास देवरूख पोलिस स्थानकाचे निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

रत्नागिरी-अलीकडे आत्महत्या करण्याचे प्रमाण युवकांमध्ये वाढले आहे ही बाब चिंताजनक आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील उच्चशिक्षण घेत असलेल्या युवकाने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ओवेस जुलफीकार मुल्ला (वय 22) असे या युवकाचे नाव आहे. मात्र आत्महत्या करण्यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलेले नाही. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील रबाळे तलावात एका 25 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. अग्निशमन दलाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्या करणारा मुलगा मागील काही वर्षापासून एका विवाहित महिलेच्या प्रेमात होता. याच प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. रबाळे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारताना तरुण सिसीटीव्ही मध्ये कैद झालाय.

हेही वाचा :