सोनं-चांदी सुसाट, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील मौल्यवान धातू सोन्याच्या(gold) किमतीमध्ये दरवाढ नोंदवली गेली. सलग दरवाढीमुळे सणासुदीत ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. या दोन आठवड्यात सोनं रॉकेटच्या तेजीत पुढं चालल्याचं दिसून येतंय. तर, चांदीने देखील मोठी भरारी घतली आहे.
गेल्या दहा दिवसांत सोन्यामध्ये(gold) 1800 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. या आठवड्यात 23 सप्टेंबर रोजी सोने 220 रुपयांनी तर मंगळवारी 210 रुपयांनी किंमती वधारल्या. 25 सप्टेंबर रोजी दर 660 रुपयांनी वाढले. काल, 27 सप्टेंबर रोजी 430 रुपयांनी किंमती वधारल्या. आज शनिवारी देखील दरवाढीचे संकेत मिळाले आहेत.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, चांदीने देखील मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या दोन आठवड्यात चांदी 6 हजारांनी महाग झाली. 25 सप्टेंबर रोजी चांदीत 2,000 रुपयांची वाढ झाली. काल, 27 सप्टेंबररोजी देखील चांदीने हजार रुपयांनी मजल मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,640, 23 कॅरेट 74,337, 22 कॅरेट सोने 69,286 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,730 रुपये, 14 कॅरेट सोने 44,249 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!
हवामान बदलामुळे जंगली टर्की पक्ष्यांची अद्भुत आगमन; इंदापूरमध्ये नवीन पाहुणे!
प्रेम, पैसा आणि ब्लॅकमेलिंग: महालक्ष्मीच्या हत्या मागील भयावह सत्य