BSNL युजर्ससाठी खुशखबर! 80 दिवसांच्या प्लॅनमध्ये आता मिळणार जास्त डेटा

BSNL नं (bsnl)आपल्या एका प्रीपेड प्लॅनच्या बेनिफिट्स मध्ये बदल केला आहे. 500 रुपयांच्या आत येणाऱ्या या पॅकमध्ये आता युजर्सना आधीपेक्षा जास्त डेली डेटा मिळत आहे. टेलीकॉम कंपनी BSNL नं प्लॅनच्या बेनिफिट्ससह व्हॅलिडिटीमध्ये देखील बदल केला आहे.

हे बदल अनेक युजर्ससाठी फायदेशीर ठरू शकतात. कंपनीनं आपल्या 485 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये बदल केले आहेत. परंतु किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. यातील बेनिफिट आणि वैधता बदलण्यात आली आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

BSNL आपल्या युजर्सना (bsnl)आता 485 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा देत आहे. आधी या प्लॅनमध्ये युजर्सना 1.5GB डेली डेटा मिळत होता. व्हॅलिडिटी मात्र आता थोडी कमी करण्यात आली आहे. आता प्लॅनची वैधता 80 दिवस झाली आहे, जी आधी 82 दिवस होती. याचा अर्थ असा की प्लॅनची वैधता जास्त न बदलता कंपनीनं डेटा बेनिफिट्समध्ये भर टाकली आहे. त्यामुळे फक्त 2 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह युजर्सना जास्त डेली डेटा मिळवता येईल.

बदल होण्यापूर्वी या प्लॅनमध्ये युजर्सना 82 दिवसांसाठी रोज 1.5GB डेटा या हिशोबाने एकूण 123GB डेटा मिळत होता. तर आता 80 दिवस 2GB डेली डेटा नुसार एकूण या प्लॅनमध्ये युजर्सना 160GB डेटा मिळत आहे. म्हणजे कंपनीनं फक्त 2 दिवसांची वैधता कमी करून 37GB अतिरिक्त डेटा देण्यास सुरुवात केली आहे.

त्याचबरोबर या प्रीपेड प्लॅनमध्ये इतर बेनिफिट्स देखील मिळतात. ग्राहकांना फक्त 80 दिवस रोज 2GB डेटा मिळत नाही तर सोबत BSNL च्या या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळत आहे.

त्यामुळे कोणत्याही नेटवर्क अमर्याद कॉलिंगचा लाभ ग्राहकांना घेता येईल. तसेच या पॅकमध्ये रोज 100 फ्री SMS देखील दिले जात आहेत. कॉलिंग आणि SMS बेनिफिट्स मध्ये कंपनीनं कोणतीही बदल केलेला नाही. हे बेनिफिट्स आधी देखील असेच होते.

हेही वाचा:

दुःखद बातमी : काँग्रेसचा आवाज हरपला; ज्येष्ठ नेत्याचे निधन

माजी कर्णधारच्या जीवाला धोका! बोर्डाने सुरक्षा देण्यास दिला नकार

रिटायरमेंटच्या काही तासांतच नव्या जबाबदारीची घोषणा, धोनीची साथ सोडून आता ‘या’ टीममध्ये…