वर्ल्डकपआधीच भारतासाठी गुड न्यूज; ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह…

क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच टी २० वर्ल्डकप स्पर्धा(good news) लवकरच होणार आहे. त्याआधीच आयसीसीकडून भारताला गुड न्यूज मिळाली आहे. टी २० क्रिकेटमध्ये ६ चेंडूंत ६ षटकार ठोकणारा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंह याची ICC men’s T20 World Cup 2024 स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नेमणूक केली आहे. यानंतर युवराज सिंहनंही भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएल(good news) २०२४ स्पर्धेनंतर काही दिवसांतच आयसीसी मेन्स टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये हा क्रिकेटचा महाकुंभमेळा भरणार आहे. १ ते २९ जून या कालावधीत स्पर्धेचा थरार बघायला मिळणार आहे. या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रकही प्रसिद्ध झालं आहे. आता आयसीसीनं भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नेमणूक केली आहे.

युवराज सिंह याने २००७ मध्ये पहिल्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत एका षटकात ६ षटकार लगावले होते. हा एक विश्वविक्रम होता. तसेच भारतानं जेतेपदही पटकावलं होतं. त्यात युवराज सिंहचं मोठं योगदान होतं.

आयसीसीने टी २० वर्ल्डकप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून युवराज सिंहची नेमणूक केली. यावर खुद्द युवराजनं प्रतिक्रिया दिली आहे. तो स्वतःच या नेमणुकीनं भारावलाय. टी २० वर्ल्डकपशी संबंधित काही चांगल्या आठवणी आहेत. ज्यात एका षटकात सहा षटकारांचाही समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेचा भाग होणं माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

हेही वाचा :

भाजप वापरणार ठाकरे पॅटर्न; शिंदेसेनेला ‘सायलेंट’ करण्याची तयारी

गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा

कृणाल पांड्या दुसऱ्यांदा झाला ‘बाबा’, मुलाला दिलं गोडंस नाव