‘मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव…’ धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! 

भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची क्रिकेट(send a message) जगतात निवृत्तीनंतरही चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही. धोनीसाठी चाहते अजून पण वेडे आहेत. जेव्हा जेव्हा चेन्नईचा सामना असतो तेव्हा स्टेडियममध्ये चाहत्यांची गर्दी होते. पण ही बातमी महेंद्रसिंग धोनीच्या नावाने होत असलेल्या स्कॅमशी संबंधित आहे. तर धोनीच्या चाहत्यांनो सावध राहा. खरं तर घोटाळेबाज धोनीच्या नावाने लोकांना संदेश पाठवत आहेत. दूरसंचार विभागाने याबाबत इशारा दिला असून लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, घोटाळेबाज धोनीच्या(send a message) लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत आणि लोकांना संदेश पाठवत आहेत. व्हायरल एक्सच्या पोस्टनुसार, स्कॅमर लोकांना मेसेजमध्ये म्हणाला की “हाय, मी एमएस धोनी आहे, मी तुम्हाला माझ्या अकाउंटवरून मेसेज पाठवत आहे. मी सध्या रांचीच्या बाहेर शेतात आहे आणि माझे पाकीट विसरले आहे. तुम्ही कृपया PhonePe द्वारे मला 600 रुपये ट्रान्सफर करू शकता का… मी घरी जाऊ परत करेल? हा स्क्रीनशॉट तुम्ही ट्विटमध्ये पाहू शकता.

हा फेक मेसेज शेअर करण्यासोबतच दूरसंचार विभागाने लोकांना अशा मेसेजपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर मेसेजमध्ये घोटाळेबाज धोनीचा एक सेल्फी पुरावा म्हणून पाठवतो आणि त्याच्या खाली ‘व्हिसल पोडू’ असा मजकूर लिहिला जातो. हा मजकूर चेन्नईसाठी वापरला जातो.

दूरसंचार विभागाने अशा कोणत्याही संदेशावर किंवा कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही sancharsaathi.gov.in/sfc वर तक्रार करू शकता. कोणताही मेसेज आला की लगेच कळवा आणि ब्लॉक करा.

हेही वाचा :

आज संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका ‘हे’ पाच पदार्थ, अन्यथा…

iPhone 13 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर, 128GB मॉडेल स्वस्तात खरेदी करण्याची संधी

मविआ उमेदवाराकडून अजित पवारांना वाकून नमस्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण