एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून तिकीट दर ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी होणार

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.(prices)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात थेट १५ टक्के सवलत जाहीर केली आहे. ही योजना येत्या १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.ही सवलत १५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी लागू असणार असून, केवळ पूर्ण तिकीटधारक प्रवाशांनाच सवलतधारकांना नाही याचा लाभ मिळणार आहे. दिवाळी व उन्हाळी गर्दीचा कालावधी वगळता वर्षभर ही योजना राबवली जाणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली आहे.

राज्यातील धार्मिक आणि सणांच्या पार्श्वभूमीवरही ही सवलत प्रवाशांना दिली जाणार आहे. (prices)येत्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या नियमित एसटी बसेससाठी आगाऊ आरक्षण केल्यास प्रवाशांना १५% सवलतीचा फायदा मिळेल. मात्र, जादा बसेससाठी ही सवलत लागू होणार नाही.त्याचप्रमाणे, गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही आगाऊ आरक्षणासोबत ही सूट मिळणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवासाचा खर्च थोडा हलका होणार आहे.

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इ-शिवनेरी बसच्या प्रवाशांनाही या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे. (prices)पूर्ण तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना १५% सवलत मिळणार असून, आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘MSRTC Bus Reservation’ मोबाईल ॲप द्वारे बुकिंग करणे आवश्यक आहे. तसेच तिकीट खिडकीवरून बुकिंग करणाऱ्यांनाही ही सूट लागू होईल.

हेही वाचा :