जून महिन्यात काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस(rain ) तर काही ठिकाणी कोरडं हवामान पाहायला मिळालं आहे. त्यामुळे शेतीच्या हंगामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागानं राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज 1 जुलै रोजी मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर याठिकाणी विशेषतः पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.मुंबई आणि उपनगरांत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही हलक्यापासून मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात काही भागांत जोरदार सरींचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांसाठी देखील यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित भागांमध्ये हलक्या सरींचा अंदाज असून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजा चमकण्यासोबतच जोरदार वाऱ्यांसह पावसाची(rain ) शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता असली, तरी शेतकऱ्यांनी सावध राहून पीक संरक्षणाची खबरदारी घ्यावी.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने येथेही यलो अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे विदर्भातील नागपूर, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मात्र फारसा पाऊस होण्याचा अंदाज नाहीया पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. दरम्यान, शेतकऱ्यांनी संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पिकांचं योग्य रितीनं संरक्षण करावं, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.
हेही वाचा :