साखर उत्पादकांसाठी गोड बातमी! इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारकडून परवानगी

साखर(sugar) उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ६ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने बी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती. पण सरकारनं आता ही बंदी उठवली आहे. त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळं तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असल्याची माहिती मिळतेय. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

सरकारने देशांतर्गत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच साखरेचा(sugar) पुरेसा पुरवठा राहावा म्हणून हा निर्णय घेतला होता. साखर नियंत्रण कायदा १९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती. अन्न पुरवठा मंत्रालयाने ७ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशात ‘साखरेचा रस आणि सिरप’ पासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील १५० इथेनॉल प्रकल्पांना थेट फटका बसला होता. केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील दिडशे साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मिती केली जाते. या प्रकल्पामधून यावर्षी तयार होणाऱ्या सुमारे आठशे कोटी लिटर इथेनॉलचे पेट्रोलियम कंपन्यांची करार देखील झाले होते. केंद्र सरकारने निर्मितीवर बंदी घातल्याने साखर कारखान्याना मोठा धक्का बसला होता.

हेही वाचा :

दोन्ही जागा निवडणूक लढवणार? काय आहे काँग्रेसचा मास्टर प्लान

या दिवशी होणार Apple चा ब्रॅंड Event, iPad सह हे प्रोडक्ट लॉन्च

‘पुष्पा 2 द रुल’चं पहिलं गाणं ‘पुष्पा पुष्पा’ चा प्रोमो प्रदर्शित