सक्तवसुली संचालनालयाने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर मोठी कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात (action)आली. यात समूहाच्या तब्बल ३,०८४ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या ४० हून अधिक मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत.ईडीच्या तपासाच्या केंद्रस्थानी रिलायन्स ग्रुपच्या दोन वित्त कंपन्या, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आहेत. या कंपन्यांवर सामान्य गुंतवणूकदार आणि बँकांकडून घेतलेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. येस बँकेने २०१७ ते २०१९ दरम्यान या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती, जी नंतर बुडीत खात्यात गेली.

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची यादी मोठी असून, त्यात ४० पेक्षा जास्त मालमत्तांचा समावेश आहे. मुंबईतील वांद्रे येथील पाली हिलमधील निवासस्थान, दिल्लीतील प्रमुख रिलायन्स सेंटर आणि याव्यतिरिक्त नोएडा , गाझियाबाद , पुणे , ठाणे, हैदराबाद व चेन्नई येथील जमिनी, कार्यालये आणि फ्लॅट्स ईडीने तात्पुरते जप्त केले आहेत.तपासात असेही उघड झाले आहे की, या कंपन्यांनी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्डाच्या नियमांचेही उल्लंघन केले. सर्वसामान्य जनतेचा म्युच्युअल फंडातील पैसा फिरवून, अप्रत्यक्षपणे येस बँकेच्या मार्गाने पुन्हा रिलायन्स ग्रुपच्याच कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आला. ईडीच्या मते, हा निधी वळवण्यासाठी एक पूर्वनियोजित योजना बनवण्यात आली होती.

या प्रकरणात अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या (action)आहेत. कंपन्यांनी कॉर्पोरेट कर्जे घेऊन ती स्वतःच्याच समूहातील इतर कंपन्यांकडे वळवली. अनेक कर्जे कोणत्याही योग्य कागदपत्रांशिवाय किंवा छाननीशिवाय एका दिवसात मंजूर करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये, कर्ज मंजूर होण्यापूर्वीच पैसे दिले गेले. ईडीने रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या १३,६०० कोटींच्या गैरव्यवहाराचा तपासही वेगाने सुरू केला आहे.
हेही वाचा :
फिरायला घेऊन जातो सांगून घेऊन गेला; निर्जनस्थळी नेत मैत्रिणीवर बलात्कार
Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स
बसचा अत्यंत भयानक अपघात! 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू; 20 पेक्षा अधिक जखमी