गुड न्यूज! तब्बल 5 हजारांनी सोनं झालं स्वस्त?
गेल्या दोन महिन्यांपासून मौल्यवान धातु सोन्याने चांगलीच आघाडी(Good news) घेतली आहे. ऑक्टोबर महिन्यात सोनं तेजीत दिसून आलं. दिवाळी सणातही सोन्याची किंमत वाढलेलीच होती.
मागील काही महिन्यात सोनं पहिल्यांदाच 80 हजारांवर पोहोचल्याचं दिसून आलं. या नोव्हेंबर महिन्यात किमती काही अंशी खाली उतरल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून मौल्यवान धातूमध्ये चढउतार दिसून येत आहे.
या आठवड्यात सोन्याच्या किंमती जोरात आपटल्या. सोमवारी सोने 600 रुपयांनी स्वस्त झाले. तर मंगळवारी किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली. सोने खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा(Good news) मिळाला आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या काही दिवसांत सोनं 80 हजारांवरून खाली आलं आहे. सोन्यात जवळपास 5 हजारांहून अधिकची घसरण दिसून आली आहे.
ग्राहकांना 24 कॅरेट एक ग्रॅमसाठी 7,729 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्यासाठी 7,085 रुपये मोजावे लागणार आहे. 22 कॅरेट 8 ग्रॅम सोन्यासाठी 56,680 रुपये मोजावे लागतील. 24 तासात जवळपास 1,350 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे.
तुळशी विवाहानंतर लग्न समारंभ सुरू होतात. त्यामुळे ऐन लग्न सराईत सोन्याने ग्राहकांना आनंदी केले आहे. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून सोनं खरेदी होऊ शकते. सराफा बाजारात आता ग्राहकांची गर्दीही हळूहळू वाढत चालल्याचं चित्र आहे.
दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा :
आज तुळशी विवाहाबरोबर जुळून आला वेशी योग; ‘या’ 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; दोन्ही गटात तुफान दगडफेक Video