जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर आनंदाची बातमी! सोनं झालं स्वस्त
आज देशभरात जन्माष्टमी(janmashtami) हा सण अगदी जल्लोषात साजरा केला जात आहे. अशातच या जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीदारांची आनंदाची बातमी आहे. वायदे बाजार व सराफा बाजारात दोन्हीकडे आज सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे आज सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे आजच्या या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
आजच्या वायदे बाजार व सराफा बाजारानुसार, आज सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत(janmashtami) घट झाली आहे. कारण या दोन्ही धातूंमध्ये आज नरमाई दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या व चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. या सोन्याच्या चढ-उतारानंतर आज २२ कॅरेट सोनं 71,761 रुपये 10 ग्रॅम आहे. अशातच मागील सत्रात सोनं हे 71,777 रुपयांवर स्थिरावले होते. तर, चांदीच्या दरामध्ये देखील 341 रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. आजच्या दराप्रमाणे चांदी 84,870 रुपये आहे तर शुक्रवारी चांदी ही तब्बल 85,211 वर स्थिरावली होती.
दिल्लीच्या सराफा बाजारात गेल्या शुक्रवारी सोन्याच्या दरात तब्बल 350 रुपयांची घसरण झाली आहे. तर, मागील व्यवहारात 99.9 टक्के शुद्धतेचे सोनं हे 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. याशिवाय शुक्रवारी चांदीची किंमत ही अवघ्या 200 रुपयांनी घसरून 87,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाली होती. मात्र सध्या श्रावण सुरू आहे. या दिवसांत अनेक सण येत असतात. त्यामुळं दागिन्यांच्या किंमतीत वाढ होत असते.
सोने व चांदीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात घट झाल्याचे कारण सांगितलं आहे. अमेरिका येथील बॉन्ड यील्डमध्ये झालेली वृद्धी आणि डॉलर इंडेक्समध्ये सुधारणा हे सोन्याच्या किंमती वाढण्यामागर्च कारण आहे. याशिवाय गुरुवारी जाहीर झालेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील विषयांचा देखील मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
आज या बाजारभावाप्रमाणे, मुंबई येथे 24 कॅरेट सोनं हे 73,067 प्रतितोळा आहे. मात्र मागील सत्रानुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर गेल्या एका आठवड्यात 1.02% ने बदलल्याचे दिसत आहे, तर गेल्या महिन्याचा विचार केला तर हे दर -3.77% ने बदलले आहेत.
हेही वाचा :
बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री राहुल गांधींच्या मागे?
३ महिन्यात ३० किलो वजन वाढलं, मौनी रॉयने ‘तो’ कठीण काळ सांगत मांडली व्यथा
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला