चिप्सच्या पुड्यांनी सजवली नवरदेवाची गाडी : Viral Video

ही नवरदेवाची गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव गाडीमध्ये बसून आला आहे पण ही गाडी फुलांनी नाही तर चिप्सच्या पुड्यांनी सजलेली दिसत आहे

भारतीय लग्न सोहळे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. लग्नातील (decorated)अनेक फोटो आणि व्हिडीओ कोणत्या ना कोणत्या कारणावरून व्हायरल होत असतात. लग्नात कधी कोणाचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी कोणाचा गाणी म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. कधी लग्नातील अनोख्या प्रथा व्हायरल होताना दिसतात तर कधी मजेशीर किस्से व्हायरल होतात. याशिवाय लग्नातील उखाण्याचे व्हिडीओसुद्धा तुफान चर्चेत येतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेवाची गाडी दिसेल. ही नवरदेवाची गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव गाडीमध्ये बसून आला आहे पण ही गाडी फुलांनी नाही तर चिप्सच्या पुड्यांनी सजलेली दिसत आहे. तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कार दिसेल. ही कार चिप्सच्या (decorated)पुड्यांनी सजलेली आहे. कार पुर्णपणे चिप्सच्या पुड्यांनी सजवलेली आहे. या कारवर वेगवेगळ्या चवींचे चिप्सच्या पुडे दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या कारमध्ये नवरदेव बसलेला आहे. नवरदेव येताच लोक या कारभोवती जमा होतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जेव्हा खाण्याची आवड असलेले जोडपे लग्न करतात…” तर एका युजरने लिहिलेय, “वरात दुकान घेऊन आली..” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या भावाच्या लग्नात मी सुद्धा असंच डेकोरेशन करणार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा :

जावयाने कापली सासूची उमेदवारी; भावना गवळींऐवजी राजश्री पाटलांना उमेदवारी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज दुसरी यादी जाहीर होणार

शेअर बाजारात पुन्हा एकदा नवीन विक्रम; निफ्टीने पार केला 22,600चा टप्पा