लपूनछपून लग्न केलेल्या तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ लीक झालाच.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तापसी 23 मार्च 2024 रोजी प्रियकर मॅथियास बो याच्यासोबत लग्नबंधनात अडकली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे फोटो किंवा व्हिडीओ समोर आले नव्हते. तसेच अभिनेत्रीने याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. तापसी पन्नू आणि मॅथियास बो यांनी कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केलं होतं. आता कोणाला न सांगता लपूनछपून लग्न केलेल्या तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ लीक झाला आहे. तापसीच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
तापसी पन्नूचा वेडिंग व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नववधूच्या रुपात दिसून येत आहे. एन्ट्रीला अभिनेत्री डान्स करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे मॅथियास लग्नमंडपात तापसीची वाट पाहताना दिसून येत आहे. नववधूच्या रुपात तापसी खूपच सुंदर दिसत आहे. लाल रंगाचा ड्रेस, लाल रंगाच्या बांगड्या आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये अभिनेत्री खूपच स्टायलिश दिसत आहे.
तापसी पन्नू जीत सिंह आण चित्रा सिंह यांच्या ‘कोठे ते आ माहिया’ या गाण्यावर थिरकताना दिसून येत आहे. त्यानंतर समोर असलेल्या मॅथियासला ती मिठी मारते आणि वरमाळा घालते. त्यानंतर दोघेही एकत्र डान्स करतात. व्हिडीओच्या शेवटी मॅथियास फुलांनी सजवलेल्या सायकलवर बसलेला दिसून येत आहे. तापसी पन्नू आणि मॅथियास यांनी पंजाबी रिती-रिवाजानुसार लग्न केलं आहे.
तापसी पन्नू ‘या’ ठिकाणी अडकली लग्नबंधनात
मीडिया रिपोर्टनुसार, तापसी पन्नू आणि मॅथियास बो उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. शाही थाटात लग्न करण्यापेक्षा कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्न करणं तिने पसंत केलं आहे. 20 ते 23 मार्च दरम्यान त्यांचा लग्नसोहळा सुरू होता. तापसी पन्नू आणि मॅथियास गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 23 मार्च 2024 रोजी ते लग्नबंधनात अडकले.
तापसी पन्नू आणि मॅथियास यांची पहिली भेट 2013 मधअये इंडियन बॅडमिंटन लीगच्या उद्घाटनादरम्यान झाली होती. दोघांनी कधी त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं नाही. तापसी पन्नूने अनेकदा मॅथियाससोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. लग्नानंतर तापसीने धुळवडीचा सण साजरा केला.