नवा पक्ष, नवा वाद! अमेरिकन राजकारणात ‘एलोन मस्क विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प’ महासंग्राम

अमेरिकेतील टेक्नो उद्योजक एलोन मस्क यांनी नवीन राजकीय(politics ) पक्ष ‘अमेरिका पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्कवर जोरदार टीका करत “ते मार्गावरून गेले आहेत”, अशा शब्दांत त्यांना हाणून पाडले आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करत मस्कच्या या राजकीय(politics ) हालचालींना ‘हास्यास्पद’ म्हणत नाकारले. ते म्हणाले, “तृतीय पक्ष स्थापन केल्याने केवळ गोंधळ निर्माण होतो. डाव्या विचारसरणीच्या डेमोक्रॅट्समध्ये आधीच अराजकता आहे. आता मस्कसारख्या लोकांमुळे ते आणखी वाढेल.”

ते पुढे म्हणाले, “रिपब्लिकन पार्टी ही देशाच्या इतिहासातील सर्वात कार्यक्षम आणि यशस्वी राजकीय(politics ) संघटना आहे. आम्ही ‘बिग ब्युटीफुल बिल’ सारखे विधेयक मंजूर केले, ज्यामुळे एलोन मस्कच्या इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) अनिवार्य धोरणाला आळा बसला. मस्क यांना हे आधीच माहीत होते, पण त्यांनी तरीही धोरणाचे समर्थन केले, हे अत्यंत दुटप्पी आहे.”

ट्रम्प यांनी मस्कवर आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, “मस्कने नासामध्ये आपल्या एका जवळच्या मित्राची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला होता, जो रिपब्लिकन विचारधारेशी संबंधित नव्हता. ही बाब केवळ गैरवर्तन नव्हती, तर हितसंबंधांचा मोठा संघर्ष होता, विशेषतः जेव्हा मस्कच्या स्पेसएक्ससह इतर कंपन्यांचे नासासोबत कोट्यवधी डॉलरचे करार सुरु होते.”

ट्रम्प यांनी मस्कच्या भूतकाळातील विवादग्रस्त संबंधांवरही लक्ष वेधले, विशेषतः जेफ्री एपस्टाईनशी संबंधित हटवलेली पोस्ट पुन्हा चर्चेत आणली. “जर मस्कने राजकीयदृष्ट्या संघर्ष निर्माण केला, तर आम्ही त्यांच्या कंपन्यांचे सर्व सरकारी करार तपासू,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.

एलोन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील नातेसंबंध काही महिन्यांपूर्वीपर्यंत सौहार्दपूर्ण होते. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांना सर्वाधिक आर्थिक मदत केली होती, आणि ट्रम्प विजयानंतर मस्क यांची DOGE या नव्या विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक केली होती. मात्र, अमेरिकन काँग्रेसमध्ये मंजूर झालेल्या ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ नंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर टीका सुरू केली. त्याचवेळी त्यांनी ‘अमेरिका पार्टी’ स्थापन करून राजकीय स्वतंत्रतेची घोषणा केली, जी ट्रम्प यांच्या दृष्टिकोनातून विश्वासघात वाटत आहे.

एलोन मस्क यांच्या नवीन पक्षाची घोषणा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तीव्र प्रतिक्रिया यामुळे अमेरिकेच्या राजकीय व्यासपीठावर तृतीय शक्तीचा प्रभाव दिसू लागला आहे. जिथे एकीकडे ट्रम्प रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून देशाला पुन्हा नियंत्रित करण्याच्या तयारीत आहेत, तिथे मस्क नव्या विचारांची आणि धोरणांची मांडणी करत आहेत. आगामी काळात, ही टक्कर ट्रम्प विरुद्ध मस्क अशी नवे स्वरूप धारण करू शकते, आणि 2028 च्या निवडणुकीत या संघर्षाचा निर्णायक प्रभाव पडू शकतो.

हेही वाचा :