महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, पण मान्सूनविषयी ‘गुड न्यूज’

हवामान विभागानं त्याचं उत्तर दिलं आहे. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांसाठीचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं दिल्लीत भूविज्ञान मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.

त्यानुसार महाराष्ट्रात एप्रिलमध्ये उष्णतेच्या (monsoon)लाटा येण्याची शक्यता आहे.तसंच, एल निनो या पॅसिफिक महासागरातल्या प्रवाहाची तीव्रता मंदावली असून त्याचा मान्सूनवर काय परिणाम होईल, हेही हवामान विभागानं समजावून सांगितलं आहे.यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत भारतात उष्णतेच्या लाटा नोंदवल्या गेल्या नाहीत.पण या काळात महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान नेहमीपेक्षा जास्त नोंदवलं गेलं. दक्षिण भारतातही या दोन्ही महिन्यांमध्ये तर मध्य भारतात मार्चमध्ये हीच स्थिती होती.

या उकाड्यातून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाची इतक्यात सुटका होण्याचीही चिन्हं नाहीत. राज्याच्या या अंतर्गत भागांमध्ये (monsoon)एप्रिल महिन्यांत उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात सलग दोन दिवस 37 अंश सेल्सियसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा सलग दोन दिवस तापमानात नेहमीपेक्षा 4.5 अंशांहून अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट आल्याचं मानलं जातं

हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात एप्रिलच्या पहिल्या पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी पोस्ट केला आहे. त्यानुसार मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये 1 आणि 2 एप्रिल रोजी तर अकोला, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत चार एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघात शक्यता असते. त्यामुळे या कालावधीत बाहेर पडताना लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी, असं  म्हटलं आहे.एप्रिलमध्ये महाराष्ट्राशिवाय गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मे महिन्यात उत्तर भारतातही पारा वर चढण्याची शक्यता असते.यंदा याच काळात लोकसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे यांनी निवडणूक विभागालाही सल्ला दिला आहे आणि योग्य काळजी घेण्यास सांगितलं आहे.

तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण 2024 या वर्षाच्या सुरुवातीला मंदावल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं होतं.

हेही वाचा:

लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने पोतं भरून आणली चिल्लर .

पुण्याच्या मध्यभागात पुन्हा तरुणीवर कोयत्याने हल्ला

धोनीच्या चौकारानंतर चाहत्यांचा जल्लोष; ‘शॉर्टमीटर’ ने 128 डीबी रेकॉर्ड केले !