महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा(scheme) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची माहिती आहे. दिवाळी आधी तुम्हाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. सप्टेंबर 2025 च्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होत असून, यंदाच्या दिवाळीपूर्वी मिळालेली ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट ठरली आहे. त्यामुळे आताच मोबाईलवर मेसेज तपासा.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणाबाबत शंका होती; पण सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केल्याने ही प्रक्रिया गतिमान झाल्याचे म्हटले जात आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन महिन्यांत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून, ज्यांनी ती पूर्ण केलेली नाही त्यांनाही हा हप्ता मिळाला आहे. यामुळे योजनेचा लाभ अधिक व्यापक झाला आहे.ई-केवायसीद्वारे कुटुंबाच्या उत्पन्नाची (अडीच लाखांपेक्षा कमी) तपासणी होत असल्याने पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे योजनेचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल.
सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी(scheme) 3960 कोटी रुपये मंजूर केले असून, सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी वळवला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता आहे.
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी निधी केवळ या प्रवर्गांसाठीच वापरला जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत 14 हप्त्यांचे वितरण झाले आहे. सप्टेंबरच्या हप्त्यासह प्रत्येक लाभार्थ्याला 1500 रुपये मिळतील.
हेही वाचा :
‘या’ तेलामुळे रक्ताच्या नसा कधीच बंद पडणार नाही, हार्ट अटॅकचा धोका राहील दूर
पाऊस परतीच्या वाटेवर लागताच सूर्य तळपला; कुठं बसणार ऑक्टोबर हिटचा चटका?
शिवाजी पार्कात प्रॅक्टिस करताना रोहित शर्मा जवळच्या व्यक्तीवरच भडकला! Video Viral