महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस
येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात(lightning) वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.सप्टेंबर महिना सुरु होताच राज्यात पाऊस सक्रिय झाला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा जलसाठा जमा झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, (lightning0चंद्रपूर, गडचिरोली तसेच वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2 Sept, latest satellite obs at 7.15 pm.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2024
Mod to dense clouds over parts of Marathwada, N Madhya Maharashtra & adjoining areas.
Watch for intermittent intense spells over these areas during next 3,4 hrs.
Watch for imd updates pl pic.twitter.com/qoFALeKIZv
नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर भागात तुफान पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार(lightning) असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून जवळपास 97 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी हे सातही धरणं काठोकाठ भरले आहेत.
हेही वाचा:
20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल
प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या
सरकार या क्षेत्राला देणार तब्बल 80,000 कोटी रुपये; देशात होणार डिजीटल क्रांती!