लागोपाठ शतकांसह स्म्रिती मंधानाने रचला इतिहास!
दक्षिण आफ्रिका महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघ(history) आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघावर ४ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या स्म्रिती मंधानाच्या(history) नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तिने मोठ्या रेकॉर्डमध्ये माजी भारतीय खेळाडू मिताली राजची बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात स्म्रिती मंधानाने शानदार फलंदाजी केली. सलामीला फलंदाजीला येत तिने भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. तिने १०३ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान तिने १ षटकार आणि १२ चौकार मारले. या मालिकेत तिच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे.
हे तिचं या मालिकेतील सलग दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात तिने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. यासह ती वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सलग २ शतकं झळकावणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी कुठल्याच महिला क्रिकेटपटूला असा कारनामा करता आला नव्हता.
यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा मिताली राजच्या नावावर होता. तिच्या नावे ७ शतकं झळकावण्याची नोंद होती. हा कारनामा तिने २११ इनिंगमध्ये केला होता. आता स्म्रिती मंधानाने देखील ७ वे शतक झळकावत मिताली राजच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तिने हा कारनामा ८४ व्या इनिंगमध्ये करुन दाखवला आहे.
हे आहेत भारतीय महिला संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारे फलंदाज
स्म्रिती मंधाना – ७ शतक*
मिताली राज- ७ शतक
हरमनप्रीत कौर- ५ शतक
पूनम राऊत – ३ शतक
या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकअखेर ३ गडी बाद ३२५ धावांची भलामोठा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना स्म्रिती मंधानाने १३६ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने नाबाद १०३ धावांची खेळी केली. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉलवार्टने नाबाद १३५ धावांची खेळी केली. तर मरिजेन कॅपने ११४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने तोडीस तोड टक्कर दिली. मात्र विजयापासून हा संघ ४ धावा दूर राहिला.
हेही वाचा :
अभिनेत्री प्रियंका चोप्राचा एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात
महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणा
देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय