षटकार मारला अन् मैदानावरच कोसळला… : VIDEO

मिरा-भाईंदर : तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू(cricket) होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मिरारोडमध्येही तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फलंदाजी करताना तरुणाने जोरदार षटकार मारला. त्यानंतर तरुणाला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरारोडमध्ये क्रिकेट(cricket) खेळताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिरारोडमधील काशिमीरा परिसरात एका टर्फमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तरुण खालीच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेफऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा काशीगाव पोलीस तपास करत आहे.

एका कंपनीकडून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कंपनीमधील तरुण टर्फमध्ये एकमेकांच्या विरोधा टर्फ क्रिकेट खेळत होते. सामन्यात फलंदाजी करताना तरुणाने जोरदार षटकार लगावला. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण जमिनीवर कोसळला. यातच तरुणाचा मृत्यू झाला.

तरुण खाली कोसळल्यानंतर इतर तरुण मदतीला धावून आल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेने कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

‘खासदारकी’ला वारं बदलताच सांगलीकरांचं पुढचं ‘टार्गेट’ ठरलं?

ठाकरे एनडीएत परतणार? उद्धव ठाकरे मोदींच्या संपर्कात?

शुभमन गिलसोबत विवाहबद्ध होणार रिद्धीमा पंडित? अभिनेत्रीने मौन सोडत सांगितले…