पुण्यातील भोंदूबाबाच्या प्रकाराची प्रकरणे ताजी असतानाच यवतमाळमध्ये देखील एका खोट्या बाबाच्या अघोरी कृत्याने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे.(slapped ) यवतमाळच्या कॉटन मार्केट परिसरात एका भोंदूबाबाने आपल्या घरातच ‘यातनागृह’ उभारून एका मायलेकींवर अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.यवतमाळ पोलिसांनी गुप्त माहितीनंतर या ठिकाणी धाड टाकली असता, घरात असलेल्या वातावरणामुळे पोलिसांचाही थरकाप उडाला. या भोंदूबाबाने महिलेला दृष्ट लागली आहे, अशा सबबीखाली उपचाराच्या नावाखाली सळईचे चटके दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या अमानुष प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
महादेव उर्फ माऊली पालवे असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याने नीतू जयस्वाल व तिची १४ वर्षीय मुलगी त्रिशा यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. दृष्टदोष असल्याचे सांगून त्यांना उपचारासाठी घरी बोलावले आणि तेथून सुरू झाला एका अघोरी प्रवृत्तीचा छळ.त्यांच्यासाठी पत्र्याच्या खोलीत बंदिस्त ‘यातनागृह’ तयार करण्यात आले होते.(slapped )घरातील पडक्या जागेत त्या मायलेकींना ठेवले जात होते आणि तेथेच सर्व विधी करणे भाग पडत होते. गरम सळईने चटके देणे, शारीरिक मारहाण, आणि मानसिक छळ अशा प्रकारांनी त्या मायलेकींच्या शरीरावर जखमांचे वळ दिसले.
या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महादेव पालवे याला अटक केली. (slapped )पीडीत मायलेकींना शासकीय रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून लैंगिक अत्याचाराचीही शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे.त्रिशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदूबाबावर बाल संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळमधील या घटनेने पुन्हा एकदा राज्यातील अंधश्रद्धेविरोधातील लढ्याचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.
हेही वाचा :