महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? : संजय राऊत

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी(win box) सुरू आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. या सभेआधी पुण्यामध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

“महायुतीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारी(win box) जाहीर झाली नाही. शिवसेना फडणवीस गटाने कल्याण- डोंबिवली तसेच नाशिकमध्येही उमेदवार दिले नाहीत. अनेक ठिकाणी औपचारिकता म्हणून उमेदवार दिलेत. जसे उत्तर मध्य मुंबईत उज्वल निकम यांना उमेदवारी दिली. उज्वल निकम जरी उमेदवार असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, तसेच महाविकास आघाडी राज्यात ३० आणि ३५ जागा जिंकेल,” असा दावाही संजय राऊत यांनी केला.

तसेच “जिंकण्याची खात्री आहे तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस धमक्या का देतात? उत्तम जानकरांच्या नावाने धमक्या देण्यात आल्या. लोकशाही आहे, लोकांना ठरवू द्या. बारामती शिरूर मतदार संघात अजित पवार धमक्या देतात. त्यांना नोटीस देतात. मात्र ४ जूनला तुम्हाला जनता बघून घेईल,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“बारामतीत शरद पवारांचा पराभव केला हे देशाला दाखवायचं असेल तर ते शक्य नाही. आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आम्ही सगळी सुप्रिया सुळेंची भावंडं आहोत. बारामतीत तळ ठोका, तंबु ठोका, काहीही होणार नाही,” असा टोलाही संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला.

हेही वाचा :

अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात

या ५ चुकांमुळे होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन

तीच तारीख, शहरही तेच! मनसे-शिवसेनेची एकाचवेळी सभा; राजकीय वातावरण तापणार!