बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी (6 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. १२१ जागांसाठी मतदान सुरू आहे. बिहारमध्ये 121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला(vote) सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 102 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 19 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. दरम्यान मतदानाच्या दिवशी एका उमेदवाराने केलेली कृती प्रचंड व्हायरल झाली आहे.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात देखील आज मतदान सुरू आहे. या जिल्ह्यातील एका उमेदवाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील भगवानपुर मतदारसंघातील आरजेडी नेता चक्क म्हशीवर बसून मतदानासाठी आल्याचे दिसून आले. आरजेडी पक्षाचे उमेदवार केदार प्रसाद यादव हे चक्क म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाच वर्षांनी लोकशाहीचा उत्सव आला आहे. आज सर्वांनी मतदान केले पाहिजे. शेतकरी असल्याने मी आज म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. मी सर्वांना मतदान(vote) करण्याचे आवाहन करतो.भारत एक कृषीप्रधान देश आहे. आम्ही शेतकरी आहोत. यासाठी मी म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. केदार प्रसाद यादव यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Vaishali: RJD नेता केदार प्रसाद यादव भैंस पर चढ़कर निकले वोट देने.. #ElectionCommission #BiharElection2025 pic.twitter.com/97lRuo4KvV
— Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) November 6, 2025
पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५१३ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १९.८३५ दशलक्ष, ३२५ पुरुष, १७.६७ दशलक्ष, २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. ३२२०७७ अपंग मतदार आणि ५३१४२३ ज्येष्ठ नागरिक मतदार (८० वर्षांवरील ५२४6८७ मतदार आणि १०० वर्षांवरील ६७३६ मतदारांसह) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ७३७७६५ मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यापैकी बहुतेक १८-१९ वयोगटातील तरुण मतदार आहेत. त्याच वेळी, १८ ते ४० वयोगटातील १९६२७३३० तरुण मतदार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५ दशलक्ष १३,३०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १.९८ कोटी ३५,३२५ पुरुष, १.७६ कोटी ७७,२१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

हेही वाचा :
CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो?
महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! पुढील 3 दिवस…; शेतकरी चिंतेत
इस्लामपूर मधील विवाहितेस घातपात करून नदीपात्रात फेकले…