बायकोबरोबर कडाक्याचं भांडण नवऱ्याने उचलले टोकाचे पाऊल स्वत:वरच झाडली गोळी

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे एका तरुणाने पत्नीशी झालेल्या (argument)वादानंतर गावठी कट्ट्याद्वारे स्वतःवर गोळी झाडून घेतली. सोमनाथ रामभाऊ वाकचौरे असे या तरुणाचे नाव आहे.सततच्या होत असलेल्या वदामुळे सोमनाथची पत्नी कंटाळून आपल्या माहेरी चिंचोळी फाटा येथे राहण्यास गेली. सोमवारी सोमनाथ वाकचौरे हा चिंचोली फाटा येथे गेला आणि पत्नीशी वाद करत तिला मारहाण व दमदाटी केली. त्यामुळे पत्नीने त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पत्नीशी झालेल्या वादाच्या कारणावरून सोमनाथ वाकचौरे याने चिंचोली फाट्याजवळच गावठी कट्ट्याने स्वतःच्या हनुवटीखाली गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. गोळीबाराचा आवाज (argument)ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी गेले असता, तो रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावठी कट्टा जप्त केला. जखमी सोमनाथला ताब्यात घेऊन तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

सरकारी नोकरी लागताच नियत बदलली; बायकोने लगेच नवऱ्याची साथ सोडली; सासरी राहण्यासाठी मागितले १ कोटी रुपये या घटनेनंतर सोमनाथची प्रकृती चिंताजनक असल्याने (argument)त्याला तातडीने पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

धक्कादायक! शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार..

हार्दिकच्या गर्लफ्रेंडने सगळ्यांसमोर केलं असं काही, पाहा व्हायरल व्हिडीओ!

काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?