‘मी वर्ल्डकप खेळणार नाही…’ IPL मध्ये तांडव घालणाऱ्या खेळाडूच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

या आयपीएलमध्ये सुनील नरेन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केकेआरकडून खेळणारा हा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू (cricket world)खेळाडू आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. मोठी गोष्ट म्हणजे सुनील नरेन या हंगामात बॉलपेक्षा आतापर्यंत बॅटने जास्त कहर करत आहे.

आयपीएलची कामगिरी (cricket world)पाहता तो 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळणार याच्या चर्चेला वेग आला आहे. पण वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू सुनील नरेनने आगामी टी-20 वर्ल्ड कप न खेळण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून सुनील नारायणने ही माहिती दिली.

सुनील नरेनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे असताल. माझ्या नुकत्याच झालेल्या कामगिरीनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेन आणि वेस्ट इंडिजकडून टी-20 वर्ल्ड कप खेळेन, असा विश्वास अनेकांना वाटत आहे. पण असे नाही, मी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणार नाही.

सुनील नरेन पुढे लिहितात की, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना शुभेच्छा, मला वेस्ट इंडिजने टूर्नामेंट जिंकताना पाहायचे आहे. अलीकडच्या काळात मेहनत घेतलेल्या खेळाडूंना वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळावी, वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक चॅम्पियन व्हावे, अशी माझी इच्छा आहे.

आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर सुनील नारायण टी-20 वर्ल्ड कप खेळताना दिसणार असे मानले जात होते. पण आता खुद्द सुनील नरेननेच या अटकळांचे खंडन केले आहे.

हेही वाचा:

जोरदार शक्तिप्रदर्शन करत बारणेंनी भरला अर्ज..

अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का यावर शरद पवार म्हणाले… 

‘या’ आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार थरार, चित्रपट अन् वेबसीरिज;