इचलकरंजी :बेंदूर सणाच्या मिरवणुकीत तरुणीला नाचवले, गौतमीला टक्कर देणारा डान्स, मग DYSP ची एन्ट्री VIDEO viral

कोल्हापूर जिल्ह्यात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान,(dance ) गुरुवारी दि.12 देखील या सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी मोठी मिरवणूकही काढण्यात आली होती. मात्र, या मिरवणुकीत एका तरुणीला नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. कोल्हापुरातील बेंदूर सणाच्या मिरवणुकीत तरुणीला नाचवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यात हा प्रकार घडला असून पोलिसांना संबंधित ठिकाणी जाण्याची वेळ आली आहे. मिरवणुकीतील तरुणीचा डान्स पाहाण्यासाठी तरुणांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी डॉल्बीचा आवाजही मर्यादेपेक्षा जास्त सोडण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली आहे.

दरम्यान, तरुणीचा डान्स सुरु झाल्यानंतर तरुणांनी डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. (dance )डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त सोडण्यात आल्याचे लक्षात येताच डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी स्वतः डॉल्बी बंद केला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.

महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकर द्वारे सोडण्यात येणारा आवाज नियंत्रित करण्यासाठी “पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986″ अंतर्गत Rules, 2000” लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार डीजे, बँड, लाउडस्पीकर यांच्यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. (dance )महाराष्ट्रामध्ये डीजे चा आवाज 40 ते 65 डेसिबलच्या मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. शांत ठिकाणी 40 डेसिबल, रहिवासी भागात 45 डेसिबल, आणि व्यावसायिक ठिकाणी 65 डेसिबल पर्यंतची मर्यादा आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते.

हेही वाचा :