सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खायचा असेल तर घरी बनवा पनीरटिक्का रोल

सकाळच्या(breakfast) नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमी नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाऊसा वाटतो. अशावेळी तुम्ही रात्री उरलेल्या पोळीपासून चमचमीत पनीरटिक्का रोल बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. शिवाय लहान मुलं आवडीने खातील.

रात्रीच्या पोळ्या जास्त झाल्यानंतर त्या सकाळच्या (breakfast)नाश्त्यात चहासोबत खाल्या जातात. मात्र चहासोबत पोळी खाण्याऐवजी काहीतरी नवीन पदार्थ बनवू शकता. पनीर हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. शिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पनीरचे सेवन करतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये उरलेल्या पोळीपासून पनीर टिक्का रोल बनवण्याची सोपी कृती.
साहित्य:
पनीर
कांदा
लाल तिखट
हळद
मीठ
कोबी
शिमला मिरची
लिंबू
कोथिंबीर
शेजवान चटणी
सॉस
चाट मसाला
टोमॅटो
कृती:
पनीर टिक्का रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांदा, गाजर, कोबी, शिमला मिरची आणि इतर सर्व भाज्या पातळ उभ्या कापून घ्या. त्यानंतर भाज्यांना मीठ लावा.
आलं लसूण पेस्ट, मीठ , हळद, लाल तिखट, चाट मसाला, कसूरी मेथी आणि तुमच्या आवडीचे इतर मसाले घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या.
तयार केलेले मिश्रण पनीरच्या तुकड्यानां लावून 15 मिनिटं ठेवून द्या. पॅनमध्ये तेल टाकून पनीरचे तुकडे व्यवस्थित फ्राय करून घ्या.
त्यानंतर पोळी गरम करा. पोळी गरम करून घेतल्यानंतर त्यावर सॉस, शेजवान चटणी लावून सगळीकडे पसरवून घ्या.
नंतर त्यावर सर्व भाज्या ठेवून वरून पनीरचे तुकडे ठेवा. नंतर त्यावर चाट मसाला आणि तुमच्या आवडीचे काही मसाले टाकून पनीर रोल गुंडाळून घ्या.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पनीरटिक्का रोल.
हेही वाचा :
सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण
राजयोग! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु
उर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून नेटकरी संतापले