मुंबई, ठाणे आणि रायगडच्या नागरिकांसाठी आयएमडीकडून अलर्ट जारी; येणार उष्णतेची लाट.

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार आहे. मुंबई, ठाण्याच्या नागरिकांना प्रचंड ऊन जाणवत आहे. आएएमडीने त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. आयएमडीने याबाबत अलर्ट जारी केलाय. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. आज आणि उद्या ३६ ते ३८ डिग्री सेल्सियस तापमान राहणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे.

राज्यात तापमान वाढलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये देखील तापमानाने कहर केला आहे. डोकं आणि तोंड झाकून घेतल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झालं आहे. उष्ण झळा लागत आहेत. उष्माघाताचा धोका वाढला आहे. हवामान विभागाने याच संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडकरांसाठी दोन दिवस धोक्याचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.