उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा…; मनसे पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला(office) पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर मनसेला गळती लागल्याचं चित्र दिसून येतंय. मनसेचे कार्यकर्ते या-ना त्या पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत.

पनवेलमधील मनसेच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ठाकरे(office) गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीकास्र सोडलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पनवेलमध्ये दुप्पटीने मालमत्ता कर आकारला जातोय. मालमत्ता कर भरु नये, असं आमचं म्हणणं नाही. परंतु अन्यायकारक कर लादू नयेत. एकीकडे मनपाचा हा कर तर दुसरीकडे सीडकोकडून करवसुली सुरुच आहे. ज्या सुविधाच मिळत नाहीत, त्यांचा कर का घेता? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी मुंबईकरांना एक वचन दिलं होतं. ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांचा कर माफ करण्याचं. ते वचन आम्ही पूर्ण केलं. आता आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर या दुहेरी करातून पनवेलकरांची मुक्तता केली जाईल.

”मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे. आता नवीन ताकद आपल्यासोबत जोडली जातेय. येत्या निवडणुकीत भाजप सत्तेत येणार नाही. त्यामुळे सर्वांनी ताकदीने महाआघाडीसोबत उभं राहावं” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना केलं.

हेही वाचा :

WhatsApp च नवं अपडेट! चॅटिंगपासून स्टेटस अपलोडिंगपर्यंत एकाच वेळी वापरता येणार

मान्सूनबाबत आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार

‘राहुल गांधी सोबत माझे लग्न…’, आमदार अदिती सिंह यांनी उघडले राज