सकाळी नाश्त्यात उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा

अनेक लोक रात्री उरलेल्या चपातीपासून चिवडा बनवतात. पण चपातीचा चिवडा खाऊन(breakfast) बोर झाले असाल तर समोसा बनवू शकता. सकाळी चहासोबत चवदार समोसा बनवू शकता.

चपाती समोसा(breakfast) बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया समोसा कसा बनवाव.

समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
चपाती

उकडलेला बटाट

बेसण

हिरवी मिरची

लाल तिखट

गरम मसाला

कोथिंबीर

तेल गरजेनुसार

मीठ चवीनुसार

कृती

रोटी समोसा बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकळवून थंड करावे. नंतर ते सोलून चांगले मॅश करावे. यानंतर कढईत तेल टाका. त्यात जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परतून घ्या. यानंतर, मॅश केलेले बटाटे पॅनमध्ये टाका.

यानंतर, सर्व मसाले आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. ते तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाका. आता ते बाजूला ठेवा आणि थंड करा.

समोसे चिकटवण्यासाठी बेसनाचे जाडसर पीठ तयार करा. यानंतर चपाती मधोमध कापून घ्या. आता एक तुकडा घ्या, एक त्रिकोण बनवा आणि त्यात बटाट्याचे सारण भरावे. शेवटी, समोसा बनवा आणि बेसन पिठाच्या मदतीने चिकटवा. आता कढईत तेल गरम करून त्यात रोटी समोसा टाकून तळून घ्या. गरमागरम चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

हेही वाचा :

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर

जबरदस्त फीचर्स आणि 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F55 5G लाँच

प्लीज हे थांबवा! रायुडूला ऑन-एअर जोकर म्हटल्याबद्दल केवीन पीटरसनने दिलं स्पष्टीकरण