Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात

हल्लीच्या काही लग्नांमध्ये वधू आणि वर दोघांकडेही हमखास फायरगन पाहायला मिळते.(weddings) असाच फायरगनचा स्टंट एका नवरीला महागात पडला आहे.सध्या काही लग्नांमध्ये आपल्या पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी नवरी किंवा नवरदेव डान्स करतात. तर काही लग्नांमध्ये फक्त शो ऑफ केलं जातं. दिखावा म्हणून लोकं काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नसतो. हल्लीच्या काही लग्नांमध्ये वधू आणि वर दोघांकडेही हमखास फायरगन पाहायला मिळते. असाच फायरगनचा स्टंट एका नवरीला महागात पडला आहे.

फायर गनमध्ये साध्या बंदूकीतून आग निघत असते. फुलबाजा आणि सुरसुरीप्रमाणे अनेक जण या गनचा वापर करतात. तर आता एका लग्नात फायर गनमुळे नवरीचा चेहराच भाजला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ(weddings)सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाची लगबग सुरू आहे. नवरी नवरदेव आपला आनंद व्यक्त करत आहेत. पाहुण्यामंडळींनी एकच गर्दी केलीये. आता या सर्वांत इंप्रेशनसाठी वधू आणि वर दोघांच्याही हातात फायर गन दिल्या आहेत. नवरदेव आधी फायर गन उडवतो. त्यानंतर नवरी देखील फायर गन सुरु करते.

काहीवेळ फायर गनमधून आग व्यवस्थित सुरू असते. मात्र काही वेळाने अचानक ही गन फुटते. त्यामुळे आगीसकट गनचा काही भाग नवरीच्या चेहऱ्यावर लागतो. त्यामुळे नवरीचा चेहरा भाजतो. ही संपूर्ण घटना तेथीलच एका व्यक्तीच्या फोनमध्ये कैद करण्यात आली आहे.

@ritik.editsx या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.(weddings)आतापर्यंत या व्हिडिओवर लाखोंच्या घरात देखील लाइक्स आलेत. नवरीचा चेहरा आगीने होरपळतो मात्र तिच्या चेहऱ्यावर त्याच्या काहीच जखमा दिसत नाहीत.

खरंतर या नवरीने खुप जास्त हेवी मेकअप केला आहे. त्यामुळे चेहऱ्यावर फायर गन येऊनसुद्धा तिला दुखापत न झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओवर एका नेटकऱ्याने देखील कमेंटमध्ये मेकअपमुळे वाचली असं म्हटलं आहे.

हेही वाचा :

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा…

ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतचा पहिला व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

‘कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या’, रासायनिक कंपन्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय