भारताच्या निर्यातीत 2.81 टक्क्यांनी वाढ; दुग्ध, पोल्ट्रीसह दागिन्यांची निर्यातही वाढली!

गेल्या जुलै महिन्यात भारताची निर्यात वाढली असल्याचा अंदाज केंद्रीय उद्योग व वाणिज मंत्रालयाने(jewelery) वर्तवला आहे. जुलै महिन्यात भारताची निर्यात ही 2.81 टक्क्यांनी वाढली आहे. जी गेल्यावर्षी याच महिन्यात 60.71 अब्ज होती. ती आता 62.42 अब्ज झाली आहे.

या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात भारताची एकूण निर्यात जवळपास 260 अब्ज डॉलर(jewelery) इतकी नोंदवली गेली होती. यावर्षीचे निर्यात लक्ष्य 800 अब्जपर्यंत गाठण्याचे सरकारने निश्चित केले आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान व्यापारी वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य 144.12 अब्ज डॉलर्स होते. मागील वर्षीच्या तुलनेत यात 4.15 टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली आहे.

जागतिक व्यापार संघटनेच्या ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्सने एप्रिलमध्ये म्हटले आहे की, 2024 आणि 2025 मध्ये जागतिक व्यापारात हळूहळू वाढ होईल. 2023 मध्ये ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमती आणि प्रगत अर्थव्यवस्थांमधील चलनवाढ यांच्या दीर्घकाळ परिणामांमुळे मागील चार महिन्यात निर्यात आकुंचन पावली होती. त्यात आता वाढ होत असल्याने दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

नॉन पेट्रोलियम, दागिन्यांच्या निर्यातीत वाढ
देशातील नॉन पेट्रोलियम उत्पादनांमध्ये आणि दागिन्यांच्या निर्यातीत मागील वर्षापेक्षा वाढ झाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांना सांगितले. मागील वर्षी ही निर्यात 25.47 बिलियन होती. ती आता 26.92 बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत 37 टक्क्यांनी वाढ
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांनंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यात वाढली आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात ही 2023 मधील निर्यातीपेक्षा तब्बल 37.31 टक्क्यांनी वाढली आहे. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यातही 3.66 टक्क्यांनी वाढवून 9.4 बिलियन डॉलर इतकी झाली आहे.

मांस, दुग्ध पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीतही वाढ
देशातील मांस, दुग्ध आणि पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीमध्ये ही थोडीशी वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ किरकोळ असली तरी ०.२९ बिलियन डॉलरवरून 0.46 बिलियन डॉलर इतकी झाली आहे. भारताने 2030 पर्यंत एकूण निर्यात दोन लाख कोटी डॉलरवर नेण्याचे लक्ष निश्चित केले आहे.

हेही वाचा :

‘या’ राशीचे लोक जगणार राजासारखं जीवन, धन-संपत्तीत होणार अपार वाढ

नीरज चोप्राला कशा मुली आवडतात? गोल्डन बॉयने स्वतः केला खुलासा

सरकारने मोठाल्या पोरांना पगार सुरु केला, आम्ही काय घोडं मारलंय? लाडकं बारीक-सारीक लेकरु योजना सुरु करा