BSNL सिममध्ये धमाकेदार चालणार इंटरनेट

जुलै महिन्यात, बीएसएनएल(bsnl sim) ही एकमेव कंपनी होती ज्यामध्ये सर्वाधिक नवीन ग्राहक जोडले गेले. बीएसएनएलच्या नवीन ग्राहकांची संख्या हजार दोन हजार नसून आता लाखात झाली आहे. ट्रायच्या अहवालानुसार, या महिन्यात सुमारे 29 लाख नवीन ग्राहक बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत.

ट्रायचा अहवाल पाहता, बीएसएनएलचे(bsnl sim) दिवस पुन्हा एकदा परतले आहेत आणि ती हळूहळू लोकांची आवडती कंपनी बनत आहे. याचे मूळ कारण म्हणजे, बाकी टेलिकॉम कंपनीचे वाढते दर. टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक युजर्सने आपले सिम करत बीएसएनएलमध्ये पोर्ट करून घेतले.

बीएसएनएल आता आपल्या 4G नेटवर्कवर वेगाने काम करत आहे. कंपनीने 2025 च्या मध्यापर्यंत सुमारे 1 लाख टॉवर्स बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जर तुमच्याकडे BSNL सिम असेल किंवा तुम्ही कंपनीचे सिम घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीएसएनएलच्या स्लो नेटवर्कमुळे अनेक युजर्स चिंतेत आहेत. जर तुम्हाला बीएसएनएल सिममध्ये नेटवर्कची समस्या येत असेल तर आता ही समस्या दूर होणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की बीएसएनएल सिममध्ये तुम्ही फुल नेटवर्क तसेच हाय स्पीड इंटरनेटचाही आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचीही गरज नाही. तुम्हाला तुमच्या सिम कार्डमधील काही सेटिंग्ज बदलावी लागतील आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या BSNL 4G सिम कार्डवर रॉकेट स्पीडने इंटरनेट वापरू शकाल.

अशा प्रकारे तुम्हाला BSNL 4G सिममध्ये हाय स्पीड इंटरनेट डेटा कनेक्टिव्हिटी मिळेल
-हाय स्पीड इंटरनेटसाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Android फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल
-आता तुम्हाला Settings च्या Network or Connections या पर्यायावर जाऊन त्यावर टॅप करावे लागेल
-यानंतर तुम्हाला मोबाईल नेटवर्क पर्यायावर जावे लागेल
-तुमच्या परिसरात 4G किंवा 5G नेटवर्क असल्यास तुम्हाला 5G/LTE/3G/2G दिसेल
-BSNL 4G मध्ये हाय स्पीड नेटवर्कसाठी, तुम्हाला हा पर्याय निवडावा लागेल. हे निवडल्याने, तुमचा डेटा वेग आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा चांगली होईल.

हेही वाचा :

पूर्ण झोप, ध्यान, अन् संतुलित जीवनशैलीने टाळा हृदयविकार – तज्ज्ञांचे मार्गदर्शन

विधानसभा निवडणुकीआधीच शिवसेना-भाजप युतीमध्ये वाद, शिंदे गटाकडून भाजपला धक्का

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा: उद्याच खात्यात जमा होणार 10 हजार रुपये – कृषिमंत्री धनंजय मुंडे