पीपीएफमध्ये दरमहा १००० रुपये गुंतवून मिळवा ८ लाखांहून अधिक परतावा

पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी एक असलेल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) योजनेत गुंतवणूक(invest) करून तुम्ही तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करू शकता. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर ७.१ टक्के व्याज मिळत असून, दरमहा केवळ १००० रुपये गुंतवून तुम्ही २५ वर्षांत ८ लाखांहून अधिक रक्कम जमा करू शकता. या योजनेची मुदत १५ वर्षे असली, तरी तुम्ही ती प्रत्येकी ५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा वाढवून एकूण २५ वर्षे गुंतवणूक करू शकता.

या योजनेत गुंतवणूक(invest), व्याज आणि मॅच्युरिटीवरील रक्कम करमुक्त असल्याने, ही योजना कर बचतीसाठी देखील एक उत्तम पर्याय आहे. पीपीएफ खात्याची मुदतवाढ करण्यासाठी, गुंतवणूकदार योगदानासह किंवा योगदानाशिवाय खाते विस्तार करू शकतात. यासाठी, संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

लाँग टर्म गुंतवणुकीद्वारे तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी भरपूर पैसे जमा करायचे असतील, तर ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. सध्या या योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर दरमहा 1000 रुपये जमा करत राहिल्यास, तुम्ही त्यात 8 लाखांहून अधिक रक्कम जोडू शकता. तुम्ही या योजनेत दरमहा 1,000 रुपये गुंतवल्यास एका वर्षात 12,000 गुंतवणूक होईल. ही योजना 15 वर्षांनी मॅच्युअर होईल, पण तुम्हाला ती प्रत्येकी 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा वाढवावी लागेल आणि 25 वर्ष सतत गुंतवणूक चालू ठेवावी लागेल.

जर तुम्ही 25 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये गुंतवले तर तुम्ही एकूण 3,00,000 रुपये गुंतवाल. पण 7.1 टक्के व्याजानुसार, तुम्ही 5 लाख 24 हजार 641 रुपये फक्त व्याजातून मिळवाल आणि तुमची मॅच्युरिटी रक्कम 8 लाख 24 हजार 641 रुपये होईल. पीपीएफ अकाउंट एक्‍सटेंशन 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये केले जाते. पीपीएफ विस्ताराच्या बाबतीत, गुंतवणूकदाराकडे दोन प्रकारचे पर्याय आहेत. पहिला म्हणजे योगदानासह खाते विस्तार आणि दुसरा, गुंतवणूकीशिवाय खाते विस्तार.

जर तुम्हाला योगदानासह खाते विस्तार करायचे असल्यास तुमचे खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अर्ज सादर द्यावा लागेल. हा अर्ज मॅच्युरिटीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी द्यावा लागेल आणि मुदतवाढीसाठी एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म त्याच पोस्ट ऑफिस/बँक शाखेत सबमिट केला जाईल जिथे PPF खाते उघडले गेले आहे.

पीपीएफ ही EEE कॅटेगरीची स्कीम आहे, त्यामुळे तुम्हाला या योजनेत 3 प्रकारची कर सूट अर्थात टॅक्स बेनेफिट मिळेल. EEE म्हणजे Exempt Exempt Exempt. या वर्गवारीत येणाऱ्या योजनांमध्ये, दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर नाही, याशिवाय, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही आणि मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम देखील करमुक्त आहे. म्हणजे गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीवर तिन्हीवर कर वाचतो.

नोंद : या योजनेची सविस्तर माहिती, व्याजदर, कर सवलत, मुदतवाढीचे पर्याय इत्यादींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या वित्तीय सल्लागाराशी संपर्क साधा.

हेही वाचा :

अजित पवार यांना संपविण्यासाठी चौकशी: विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार

मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते ‘धर्मवीर-2’ चे पोस्टर लॉन्च, ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा