‘साखरपुडा झाला; पण लग्न झालं नाही’, असं सतेज पाटील कोणाबद्दल म्हणाले !

 सहा खासदारांबद्दल पूर्वीपासूनच साशंकता निर्माण झाली आहे. यापुढे काही गोष्टी घडणार आहेत. उमेदवारी बदलापर्यंत गोष्टी घडणार आहेत. भाजप कशा पद्धतीने वापरून घेत आहे हे समोर आले आहे, अशा शब्दांत शिंदे गटाच्या उमेदवार (sugarcane)बदलावरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी टीका केली आहे. भावना गवळी आणि हेमंत गोडसे यांचे शिवसेना शिंदे गटाने तिकीट कपल्यानंतर आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीने उमेदवार दिल्यानंतर सतेज पाटील यांनी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. शेट्टी आणि ठाकरे यांच्यात चर्चा होती. मात्र, शेट्टीच्या चर्चेला अंतिम स्वरूप आले नाही. महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघात आहे. शिरोळ, हातकणंगले, शिराळा, शाहूवाडी, वाळवा आणि इस्लामपूरमध्ये ताकद आहे. शेट्टींनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. साखरपुडा(sugarcane) झाला; पण लग्न झालं नाही, अशा शब्दांत शेट्टी यांच्यावर निशाणा साधत फटका कोणाला बसणार हे सांगता येणार नाही. पण महाविकास आघाडीची ताकद बेदखल करून चालणार नाही, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

सांगलीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल. विश्वजित कदम यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. यातून लवकरच मार्ग निघेल यात शंका नाही. ज्या पद्धतीने नवनीत राणा यांना न्याय मिळाला, त्याच पद्धतीने आमच्या रामटेकच्या उमेदवाराला मिळावा. (sugarcane)न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, आम्हालाही रामटेकमध्ये न्याय मिळेल असे आम्हाला अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हा महामार्ग केला जातोय. कोल्हापूर, धाराशिव यासह जिथून हा रस्ता जातो तेथील शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. हा महामार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचा वापर केला पाहिजे. ज्या तीर्थक्षेत्रांना हा मार्ग जोडणार आहे. त्या ठिकाणी हा निधी गेला पाहिजे. महामार्गावर पैसे खर्च करण्यापेक्षा तीर्थक्षेत्रावर पैसे खर्च करा. ठेकेदारांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला.

हेही वाचा :

शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

वर्षा बंगला सत्तेच केंद्रस्थान बनलाय? हेमंत पाटलांच्या शक्तीप्रदर्शनावरून विरोधकांचे टीकास्त्र

इचलकरंजी : कबनूर उरुसानिमित्य उद्या कुस्त्यांचे जंगी मैदान!