शीर नसलेला मृतदेह आढळल्याने कोल्हापुरात खळबळ

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देखील परिसरात तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती शहरात वा-या सारखी पसरली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची (human body)मोठी गर्दी जमली हाेती.

कोल्हापूर येथील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल शेजारी हुतात्मा पार्कच्या ओढ्यात एक मृतदेह पडल्याची माहिती पाेलिसांनी मिळाली. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तेथे त्यांना शीर कापलेला एका पुरुषाचा मृतदेह आढळला. दरम्यान या प्रकाराची माहिती कोल्हापूर शहरात वा-या सारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी माेठ्या प्रमाणात बघ्यांची (human body)गर्दी वाढली.

काेल्हापूर महापालिकेकडून जेसिबीच्या माध्यमातून नालेसफाई मोहिम सुरू आहे. ही स्वच्छता माेहिम सुरु असताना कर्मचारी यांना ओढ्यात मृतदेह आढळला. त्यांनी लगेच याची माहिती पाेलिसांना दिली.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पुरुष(human body )जातीचा शीर कापलेला सडलेला मृतदेह घटनास्थळी आढळला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देखील परिसरात तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती शहरात वा-या सारखी पसरली. यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली हाेती.

हेही वाचा :

वर्षा बंगला सत्तेच केंद्रस्थान बनलाय? हेमंत पाटलांच्या शक्तीप्रदर्शनावरून विरोधकांचे टीकास्त्र

इचलकरंजी : कबनूर उरुसानिमित्य उद्या कुस्त्यांचे जंगी मैदान!

सांगली लोकसभेवरून मविआत तिढा? ठाकरे गट चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेणार? संजय राऊत म्हणाले…