मोडेल पण वाकणार नाही! जंगलाच्या राजाशी वाघाने घेतला पंगा… Video Viral

सोशल मीडियावर आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओज(Video) व्हायरल झाले आहेत. तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही हे व्हायरल व्हिडिओज नक्कीच पाहिले असतील. इथे अनेक अशा घटना दर्शवल्या जातात ज्यांचा आपण कधीही विचार करू शकत नाही.

तसेच इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ(Video) देखील शेअर केले जातात. यात अधिकतर प्राण्यांमधील लढतींचे दृश्ये दिसून येते. ही लढत काही साधी-सुधी नव्हे तर.. यातील दृश्ये अनेकदा लोकांचे होश उडवून टाकतात. सध्या देखील सोशल मीडियावर अशाच एका भीषण लढतीचा थरार व्हायरल झाला आहे.

आता प्राण्यांची लढत म्हटली की ती विशेषतः आपल्या शिकारीसाठी केलेली लढत असते. जंगलातील काही बलाढ्य आणि धोकादायक प्राणी आपल्या ताकदीचा फायदा घेत इतर प्राण्यांवर हल्ला चढवतात आणि त्यांच्या मृत्यूचा दारी पोहचवतात. अशा घटनांचे अनेक व्हिडिओज आजवर सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत.

मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. वाघ आणि सिंह हे जंगलातील सर्वात धोकादायक आणि ताकदीचे शिकारी आहेत त्यांनी आजवर अनेक प्राण्यांना मृत्यूच्या दारी पोहचवले आहे मात्र जेव्हा हे दोन शिकारी आमने-सामने येतात तेव्हा काय घडते याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. नुकताच इंटरनेटवर वाघ आणि सिंहातील एका थरारक लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या लढतीतील थरारक दृश्ये आता अनेकांना अचंबित करत आहेत.

जिथे सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो. त्याचबरोबर वाघही स्वतःमध्ये कमी नाही. पण जर सिंह आणि वाघ एकमेकांशी भिडले तर या लढतीत कोण जिंकणार? हे ठरवणे थोडे कठीण असू शकते. कारण दोघांची गणना जंगलातील उच्चभ्रू प्राण्यांमध्ये होते. सिंह आणि वाघाच्या धोकादायक लढतीत नक्की कोण विजयी ठरेल याचे उत्तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून लोकांना मिळाले आहे.

सिंह, वाघापेक्षा हळू असल्याने, त्याचे विजेचे-वेगवान हल्ले थोडे मंदावते. तरीही व्हिडिओमध्ये दोहांमध्ये अवघ्या काही सेकंदाची झुंज पाहायला मिळते. पण वाघाला संधी मिळताच तो लगेच सिंहाला पाडून खेळ संपवण्याचा निर्धार करतो. पण सिंहही काही कच्च्या तुकड्यांशी खेळला नाही. अशा स्थितीत वाघाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तो लगेच उठतो आणि त्याच्यावर पुन्हा हल्ला करतो. सुमारे 8 सेकंदांची ही लहान क्लिप या हल्ल्याने संपते.

सिंह-बघतील या लढतीचा व्हायरल व्हिडिओ @pathfinder2016 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत या लढतीवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला मान्य आहे की वाघ अधिक बलवान आणि वेगवान आहे पण सिंह कधीही हार मानत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघ सिंहापेक्षा अधिक बलवान आहे”.

हेही वाचा :

नितीश कुमार भाजपचा पाठींबा काढणार? शरद पवारांनी दिली प्रतिक्रीया

अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी

खुर्चीवर उभं राहून घ्यावी लागली ‘या’ बॉलरची मुलाखत! तो आहे तरी कोण?