जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या प्रेमात, अखेर अभिनेत्रीने गळ्यात..

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या(love) चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वी बवाल हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याचे सांगितले जाते. अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट देखील होतात. मात्र, शिखर पहाडिया किंवा जान्हवी कपूर यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधी काही भाष्य केले नाही.

मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया(love) यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केला. मात्र, त्यावर खुलासा नाही होऊ शकला. आता नुकताच एका शोमध्ये जान्हवी कपूर ही पोहचली. यावेळी जान्हवी कपूर हिने घातलेल्या सिल्वर रंगाच्या पेंडेटकडे सर्वांच्या नजरा दिसल्या. अत्यंत खास असे पेंडेट जान्हवी कपूर हिने गळ्यात घातल्याचे दिसले.

जान्हवी कपूर हिने गळ्यात शिकू नावाचे पेंडेट घातले. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर ही करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. जान्हवी कपूर त्यावेळी म्हणाली होती की, शिखर पहाडिया याला ती प्रेमात शिकू म्हणते. आता शिखर पहाडिया याच्याच नावाने थेट पेंडेट गळ्यात घालून जान्हवी कपूर ही एका शोमध्ये पोहचली.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी जरी त्यांच्या रिलेशनवर कधी काही भाष्य केले नसले तरीही ते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवी कपूर ही काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसली होती. हेच नाही तर शिखर पहाडिया हा बोनी कपूर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच विमानतळावर स्पाॅट झाला.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचे शिक्षणची एकसोबतच झाले आहे. शिखर पहाडिया हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, शिखर आणि जान्हवी यांनी त्यांचे रिलेशन अजून ऑफिशियल केले नाहीये.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

बायकोशी वाद.. चिडलेल्या जावयाने सासुच्या दुचाकीसह १५ गाड्या पेटवल्या

‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल