जान्हवी कपूरने केला होणाऱ्या पतीबद्दल मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कायमच चर्चेत असते. जान्हवी कपूरची(celebrities) सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच बोनी कपूर हे लेकीसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले होते. यावेळी लेकीचीच पोलखोल करताना बोनी कपूर हे दिसले होते. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. जान्हवी कपूर ही शिखर पहाडियाला डेट करत आहे. दोघे कायमच स्पाॅट होताना देखील दिसतात. आता नुकताच जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय.

आपल्या आगामी चित्रपटाचे(celebrities) प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये जान्हवी कपूर पोहचली होती. यावेळी चक्क होणाऱ्या नवऱ्यामध्ये कोणते गुण असायला हवेत, हेच सांगताना जान्हवी कपूर दिसली. जान्हवी कपूर म्हणाली की, मला असा व्यक्ती हवा आहे की, माझे सर्व स्वप्न तो स्वत:ची बनवेल. मला समजणारा आणि प्रोत्साहन देणारा.

हेच नाही तर पुढे जान्हवी कपूर म्हणाली, मला हसवणारा, आनंद देणारा. मी रडत असेल तर मला समजून सांगणारा, मला साथ देणारा, असा होणारा पती हवा आहे. यापूर्वीच आपल्या लग्नाबद्दल बऱ्याच वेळा बोलताना जान्हवी कपूर ही दिसली आहे. इतके सर्व गुण असणारा व्यक्ती पती म्हणून जान्हवी कपूर हिला हवा आहे. समजदार व्यक्ती आपल्या आयुष्यात हवा असल्याचेही जान्हवी कपूरने स्पष्ट केले.

जान्हवी कपूर हिला तिच्या लग्नाचे डेकोरेशन देखील पारंपारिक पद्धतीने केलेले हवे आहे. मोगऱ्याच्या फुलांचे डेकोरेशन तिला हवे आहे. कांजीवरम साडीत जान्हवी कपूरला लग्न करायचे आहे. जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे. हे दोघे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जातंय.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर पहाडिया याचा भाऊ वीर पहाडिया हा सारा अली खान हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच सारा अली खान आणि वीर पहाडिया यांचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसले. मात्र, त्यांनी अजून त्यांच्या रिलेशनबद्दल भाष्य केले नाहीये.

हेही वाचा :

‘मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात…’; ‘या’ अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा

होर्डिंग पडून लोकांचा मृत्यू, त्याचठिकाणी रोड शो…अमानुष गोष्ट; राऊतांचा PM मोदींवर हल्लाबोल

अंगावर शहारे आणणार होर्डिंग कोसळण्याचा व्हिडिओ आला समोर