लाज वाटली पाहिजे तुला..; मंदिरात शॉर्ट्स घालून गेल्याने अंकिता लोखंडे ट्रोल

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत साध्याभोळ्या अर्चनाची भूमिका साकारून(temple) अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. काही महिन्यांपूर्वी ती पती विकी जैनसोबत ‘बिग बॉस’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अंतिम पाच स्पर्धकांमध्ये आपलं स्थान निश्चित केल्यानंतर ती या शोमधून बाद झाली. बिग बॉसनंतर अंकिता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

याशिवाय तिच्या एका वेब शोचीही घोषणा झाली आहे. आता अंकिता तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. त्यामागचं कारण म्हणजे अंकिताने परिधान केलेले कपडे. मंदिरात(temple) शॉर्ट्स घालून घेल्याने नेटकरी अंकितावर भडकले आहेत.

अंकिताचा हा व्हिडीओ काही पापाराझींनी शूट केला आहे. मुंबईतील एका मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर ती तिच्या कारकडे चालत येत होती. त्यावेळी पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ शूट केला. मात्र मंदिरात जाण्यासाठी अंकिताने जे कपडे घातले होते, ते पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अंकिताने ओव्हर-साइज्ड टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केले होते. पापाराझींनी व्हिडीओ शूट करताना तिच्या हाताच्या दुखापतीबद्दल विचारलं. त्यावेळी ती त्यांना म्हणते, “अरे जाऊ द्या यार, मंदिरात आलेय मी.” मंदिरात अशा पद्धतीचे तोकडे कपडे कोण परिधान करतं, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

‘थोडी तरी लाज वाटली पाहिजे, मंदिरात असे कपडे कोण घातलं?’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही आधीपासूनच वेडी होती. बिग बॉसमध्ये जाऊन आल्यानंतर तिच्या डोक्यावर आणखी परिणाम झाला आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘अंकिताला मानसिक उपचाराची गरज आहे, हल्ली ती वेड्यासारखीच वागताना दिसतेय’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी अंकिताला आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला होता. मुंबईत वादळी वाऱ्यासह वळिवाचा पाऊस पडल्यानंतर तिने हा व्हिडीओ शूट केला होता. डोळ्यांसमोर वादळी वारा आणि पाऊस पडताना दिसत असूनही ती व्हिडीओत प्रश्न विचारताना दिसतेय, “हे काय आहे? हे काय होतंय?” त्यामुळे अंकिता उगाच ओव्हरॲक्टिंग करत असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं.

हेही वाचा :

शरद पवार गट, ठाकरेंचा गट फुटणार असल्याचा भाजप नेत्याचा दावा

अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन, राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती जारी

“घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी…”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल