Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सनी इकडे लक्ष द्या, आजपासून लागू झाले नवीन नियम!

देशात आज नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 पासून दूरसंचार कंपन्यांसाठी अनेक महत्त्वाच्या नियमांत(new rules) बदल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्सच्या सुरक्षेचा विचार करता दूरसंचार विभागाने नवीन नियम जाहीर केले होते. यातील काही नियम 2024 मध्ये लागू करण्यात आले होते. उर्वरित नियमांची अंमलबजावणी आज 1 जानेवारी 2025 पासून केली जाणार आहे.

सर्व कंपन्यांना दूरसंचार कायद्यात समाविष्ट केलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हे नियम लागू करण्यामागे दूरसंचार कंपन्यांची सेवा सुधारणे हा दूरसंचार विभागाचा उद्देश आहे. आजपासून म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून दूरसंचार कायद्यात कोणत्या नवीन नियमांचा(new rules) समावेश करण्यात आला आहे, याबद्दल जाणून घेऊया. कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व नविन नियमांचं दूरसंचार कंपन्यांना पालन करावं लागणार आहे.
आजपासून लागू होणार नवीन नियम
राइट ऑफ वे (RoW) नियम आजपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून देशभरात लागू होत आहे. सप्टेंबरमध्ये टेलिकॉम कायद्यात या नियमाचा समावेश करण्यात आला होता, मात्र आजपासून हा नियम लागू होणार आहे. ट्रायने स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व कंपन्यांना हे नियम पाळावे लागतील.
नवीन नियमांमध्ये काय आहे…
नवीन नियमांनुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लाइन्स आणि नवीन मोबाइल टॉवर्स बसवण्यावर भर द्यावा लागणार आहे. दूरसंचार विभागाने सांगितले आहे की, नवीन नियम 1 जानेवारीपासून सर्व टेलिकॉम कंपन्यांना लागू होतील. राइट ऑफ वे (RoW) नियमांच्या अंमलबजावणीमुळे कंपन्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यास मदत होईल. Jio, Airtel, VI, BSNL सारख्या दूरसंचार कंपन्या नवीन मोबाइल टॉवर कुठे लावू शकतात याबद्दल नवीन नियमांत माहिती देण्यात आली आहे.
मोबाईल टॉवर बसवणं आता अधिक सोपं होणार
आता टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल टॉवर लावण्यासाठी फारशी गडबड करावी लागणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल टॉवर बसवण्यासाठी कंपन्यांना अनेक ठिकाणची परवानगी घ्यावी लागत होती, मात्र आता एकाच ठिकाणाहून परवानगी घ्यावी लागणार आहे. Jio, Airtel, VI, BSNL या कंपन्यांचे युजर्स आणि देशभरातील टेलिकॉम कंपन्यांचा विचार करता हे नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
टेलिकॉम ऑपरेटर्सनी केली होती विनंती
नवीन RoW नियम पारदर्शकता आणि कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डिजिटल रेकॉर्ड राखण्याची प्रक्रिया सुलभ करते. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम ऑपरेटर्सनी सरकारला आरओडब्ल्यू नियम लागू करण्याची विनंती केली होती. या नियमामुळे पारदर्शकता येईल आणि कार्यक्षमतेतही सुधारणा होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे लागू करण्यात आलेले हे नवीन नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा :
कर्ज लवकर मिटवण्यासठी प्री पेमेंट करताय? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
“ट्रॅव्हिस हेडने हेल्मेट फेकला, चाहत्यांनी केली गांगुली स्टाईल सेलीब्रेशन! Video
Instagram आणि YouTube व्हिडीओतून कमाई करू इच्छिता? जाणून घ्या, कुठे मिळतो बक्कळ पैसा!