जिओ, Vi, एअरटेलला दरवाढ भोवली, लाखो युजर्सनी सेवा सोडली

दूरसंचार कंपन्यांनी काही आठवड्यांपूर्वी आपल्या रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किंमती वाढवल्याने कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार दरवाढीनंतर भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला ग्राहकांचे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. जुलै महिन्यात या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांचे ग्राहक कमी झाले. याविषयी अधिक सविस्तर जाणून घ्या.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (recharge) यांना जुलैमध्ये ग्राहकांचे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) आकडेवारीनुसार, जुलैअखेर जिओ, एअरटेल आणि व्हीआयने अनुक्रमे 7.5 लाख, 10.69 लाख आणि 10.41 लाख ग्राहक गमावले. ज्यानंतर या कंपन्यांच्या ग्राहकसंख्येत लक्षणीय घट झाली. जिओचे ग्राहक 475.76 दशलक्ष, एअरटेलचे 387.32 दशलक्ष आणि व्होडाफोनचे 215.88 दशलक्ष ग्राहक कमी झाले आहेत.

या तिन्ही दूरसंचार कंपन्यांनी केलेल्या दरवाढीचा थेट फायदा BSNL या सरकारी कंपनीला झाला. जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडियाला सोडून गेलेले ग्राहक BSNL कंपनीकडे वळले. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला 20.93 लाख युजर्स मिळाले. यानंतर कंपनीचा ग्राहक वर्ग वाढून 88.51 दशलक्ष झाला आहे.

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांनी जुलैमध्ये आपले दर 11 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवले होते. त्याचवेळी बीएसएनएलने टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली नाही. कंपन्यांच्या या निर्णयाचा परिणाम त्यांच्या मार्केट शेअरवर मोठ्या प्रमाणात दिसून आला. रिपोर्टनुसार, जिओचा मार्केट शेअर 40.68 टक्क्यांवर आला आहे. एअरटेल 33.12 टक्क्यांवर आला. आणि व्होडाफोनचा 18.46 टक्क्यांवर आला. याउलट बीएसएनएलचा मार्केट शेअर 7.33 टक्क्यांवरून 7.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.

एअरटेलने मात्र कंपनीच्या महागड्या सेवेचा वापर करून येथे युजर्स जोडण्यात यश मिळवले. कंपनीने जुलैमध्ये 4G आणि 5G सेवा वापरणारे 20.5 लाखांहून अधिक युजर्स जोडले. तर जिओने इतके जास्त पैसे देणारे 7.6 लाख ग्राहक गमावले.

युजर्सकडे अनेक पर्याय उपलब्ध आहे. एखाद्या दूरसंचार कंपनीने प्लॅनची किंमत वाढवली की युजर्स दुसऱ्या कंपनीचा प्लॅन विकत घेतात. हे शक्यही आहे. कारण, बाजारात दूरसंचार कंपन्या आपल्या प्लॅन्समधून ग्राहकांना कसं आकर्षित करता येईल, याकडे लक्ष देत असतात. त्यामुळे ग्राहकांकडे आता अनेक पर्याय आले आहेत. महागड्या प्लॅनमुळे वैतागलेले ग्राहक आता बीएसएनएलकडे देखील वळू लागले आहेत. त्यामुळे एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांची चिंता वाढल्याचं चित्र आहे.

हेही वाचा:

मी राजीनामा का दिला…; अरविंद केजरीवाल स्पष्टच बोलले

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या भिंतींना, घुमटाला तडे

मराठा-ओबीसी संघर्षावर शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले; आता…