Jio चा ९० दिवसांचा धमाकेदार प्लान; युझर्सला मिळेल अतिरिक्त डेटाचा फायदा

रिलायन्स जिओ नेहमी आपल्या युझर्सची नड ओळख ऑफर(data quality) आणत असते. त्यामुळे कंपनीने स्वस्त तसेच महागडे आणि अल्पकालीन तसेच दीर्घकालीन प्लान सादर केले आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणतीही प्लान निवडू शकता. जर तुम्ही Jio सिम वापरत असाल आणि दीर्घ वैधता असलेला प्लान शोधत असाल तर आम्ही तुम्हाला एका शानदार प्लानबद्दल माहिती देणार आहोत.

जिओकडे वेगवेगळ्या डेटा(data quality) ऑफरच नाहीत तर वेगवेगळ्या वैधतेच्या प्लानदेखील आहेत. यामध्ये २८ दिवस ३० दिवस ५६ दिवस ८४ दिवस ३६५ दिवसांसाठी अनेक आश्चर्यकारक प्लान उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लानची माहिती देणार आहोत ज्याची वैधता ९० दिवस आहे. जिओने काही दिवसांपूर्वी आपल्या पोर्टफोलिओमध्ये क्रिकेट ऑफर अंतर्गत ७४९ रुपयांचा प्लान आणला होता. या प्लानमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना उत्तम ऑफर देत आहे. जर तुम्हाला अधिक डेटा आणि दीर्घ वैधता प्रदान करणारा प्लान हवा असेल तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

Jio ७४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ९०दिवसांची दीर्घ वैधता ऑफर करते. यामध्ये यूजर्सना कोणत्याही नेटवर्कवर ९० दिवसांसाठी मोफत अमर्यादित कॉलिंग सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगसोबतच दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतात. Jio च्या या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या डेटा ऑफरबद्दल म्हणाल तर संपूर्ण वैधतेसाठी १८० GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही दररोज २जीबी डेटा वापरू शकता. केवळ नियमित डेटाच नाही तर कंपनी या प्लानमध्ये मोफत डेटा देखील देते. या प्लानमध्ये तुम्हाला २० जीबी डेटा फ्री मिळेल. अशाप्रकारे कंपनी या पॅकमध्ये युझर्सला एकूण २०० जीबी डेटा ऑफर करते.

रिलायन्स जिओचा हा प्लॅन अमर्यादित 5G डेटा ऑफरसह येतो. तुमच्या परिसरात 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल तर तुम्ही या प्लानसह अमर्यादित ५ जी डेटा विनामूल्य वापरू शकता. या रिचार्ज प्लानमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.

हेही वाचा :

दहा दिवसांत दहा टक्के वधारला उजनी धरणात पाणीसाठा

बोगस धान्य वितरणाला बसणार आळा; रेशनकार्डधारकांना ई-केवायसी अनिवार्य

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत सरकार सकारात्मक