जिओचा स्वस्त प्लॅन, 2 GB डेली डेटासह अनलिमिटेड कॉलिंग
स्वस्त आणि मस्त, असा प्लॅन आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. रिलायन्स जिओने रिचार्ज प्लॅन(recharge plan) महाग केले असले तरी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अजूनही असे अनेक प्लॅन आहेत, जे दीर्घ वैधतेसाठी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देतात. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.
तुम्ही स्वस्त आणि चांगले फायदे असणारे प्लॅन(recharge plan) शोधत असाल. तर आज आम्ही कॉलिंग, डेटा आणि एसएमएस बेनिफिट्स देणाऱ्या प्लॅनचे डिटेल्स सांगणार आहोत. त्याची किंमतही खूप कमी आहे. जर तुम्ही जिओ युजर असाल तर तुम्ही हा प्लॅन अॅक्टिव्हेट करू शकता.
रिलायन्स जिओच्या 198 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 14 दिवसांसाठी 28 GB डेटा मिळतो. रोज 2 GB डेटाचा आनंद घेता येईल. याची वैधता जरी 14 दिवसांची असली तरी या अर्थाने कंपनी चांगला डेटा देत आहे. प्लानमध्ये 2 GB डेटा व्यतिरिक्त कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. कॉलिंगचा लाभ लोकल आणि STD कुठेही मिळू शकतो. प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएसची सुविधा मिळते.
डेली डेटा पॅक संपल्यावर इंटरनेट चालेल
या प्लानमध्ये कोणत्याही अॅपचे सब्सक्रिप्शन दिले जात नाही. याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागतील. या प्लॅनची चांगली गोष्ट म्हणजे डेली डेटा पॅक संपल्यानंतर अनलिमिटेड 5G डेटा अॅक्सेस करण्याची सुविधा आहे. मात्र, ही सेवा केवळ त्याच भागात मिळणार आहे जिथे कंपनीची 5जी सेवा उपलब्ध असेल.
जिओचा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचा 299 रुपयांचा प्लान जवळपास 1 महिन्याच्या वैधतेसह आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे. युजर्संना रोज 1.5 GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये युजर्संना जिओ टीव्ही, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमाचा फायदा मिळतो.
जिओचा 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा एक प्लान 249 रुपयांचा येतो. या प्लॅनमध्ये युजर्संना 28 दिवसांसाठी या सुविधेचा लाभ मिळतो. यात दररोज 1 GB डेटा आणि 100 SMS फ्री मिळतात. प्लानसोबत अनलिमिटेड डेटा मिळतो. यासोबत जिओ अॅप्सचा फायदा मिळतो. युजर्सजिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचा मोफत लाभ घेऊ शकतात.
जिओचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओचा 91 रुपयांचा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामुळे युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लॅनमध्ये एकूण 50 SMS मिळतात. याशिवाय एकूण 3 GB डेटाचा ही फायदा मिळतो. प्लॅनसोबत रोज 100 MB डेटा आणि 200 MB अतिरिक्त डेटा दिला जातो. 5G नेटवर्कचा लाभ घेणारे युजर्स अनलिमिटेड डेटाचा फायदा घेऊ शकतात.
हेही वाचा :
…मग मी बघतो, तुम्ही आमदार कसे राहता”, अजित पवारांनी कोणाला दिला इशारा?
‘भारत नाही आला तर…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची टीम इंडियाला धमकी
आधी लाडक्या बहिणींना भर सभेत धमकी नंतर जाहीर माफी, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?