फक्त पैसा-प्रसिद्धीसाठी.. नोरा फतेहीकडून बॉलिवूड कपल्सच्या लग्नाची पोलखोल

अभिनेत्री नोरा फतेहीची एक मुलाखत(couples resorts) सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीतून तिने बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर या सेलिब्रिटी कपल्सबद्दल तिने धक्कादायक दावा केला आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक जोड्या या केवळ एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दाखवतात, पण खऱ्या अर्थाने हे सगळं केवळ स्वत:च्या फायद्यासाठी असतं, असं तिने म्हटलंय. हे सेलिब्रिटी त्यांचं खासगी आयुष्य आणि काम यांचं मिश्रण करतात आणि त्यामुळेच ते नैराश्यात येतात किंवा आत्महत्येसारखे विचार त्यांच्या डोक्यात येतात, असंही नोरा म्हणाली.

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये(couples resorts) नोरा म्हणाली, “त्यांना फक्त तुमच्या प्रसिद्धीचा स्वत:साठी वापर करून घ्यायचा असतो. ते माझ्यासोबत असं काही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी अशा कोणत्याही व्यक्तीमागे धावताना किंवा डेटिंग करताना दिसत नाही. पण माझ्यासोबत हे सर्व घडताना मी पाहतेय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोक केवळ प्रभावासाठी लग्न करतात.

हे लोक त्यांच्या पत्नीचा किंवा पतीचा वापर नेटवर्किंग, ओळख वाढवण्यासाठी, पैशांसाठी किंवा नाव जोडण्यासाठी करतात. ते असा विचार करतात की, अमुक एका व्यक्तीशी मला लग्न करायचं आहे, जेणेकरून मी त्याच्याशी पुढील तीन वर्षे जोडली जाऊ शकते. त्याचे काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत आणि ते बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. त्यामुळे मला त्या लाटेवर स्वार व्हायचंय. इतकं मोजमाप करून विचार करणारे हे लोक आहेत.”

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींवर टीका करत नोरा पुढे म्हणाली, “हे सर्व पैसा आणि प्रसिद्धीच्या भुकेपोटी होतं. अशा मुली किंवा मुलं त्यांचं संपूर्ण आयुष्य पैसा, प्रसिद्धी आणि पॉवरसाठी उद्ध्वस्त करायला तयार असतात. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेमसुद्धा करत नाहीत, अशा व्यक्तीशी लग्न करून वर्षानुवर्षे सोबत राहण्याइतकी वाईट गोष्ट कोणतीच नाही. आपल्या इंडस्ट्रीत असं अनेकजण करत आहेत. त्यांना फक्त इंडस्ट्रीतल्या एका विशिष्ट गटात टिकून राहायचंय, म्हणून ते सर्व करत आहेत.

आपल्या करिअरचं काय होणार, हेच त्यांना माहित नसल्याने प्लॅन अ, प्लॅन ब असे त्यांचे प्लॅन्स तयार आहेत. आपलं खासगी आयुष्य, मानसिक आरोग्य आणि आनंद यांचा त्याग करण्यामागचं कारणच मला समजत नाही. कारण काम हे काम असतं. आपलं घर, खासगी आयुष्य हे सर्वस्वी वेगळं आहे. या दोन्ही गोष्टींचं मिश्रण तुम्ही करू शकत नाही. असं केल्यास तुम्ही कधीच खुश राहू शकणार नाही. मग तुम्हाला प्रश्न पडतो की मी नैराश्यात का आहे?”

हेही वाचा :

शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला खिंडार पडणार

भाजपसोबत महाविकास आघाडीनं 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

मित्रांसोबत दारु प्यायली, बाथरुममध्ये गेली आणि परत आलीच नाही; 30 वर्षीय गायिकेचा मृत्यू