मित्रांसोबत दारु प्यायली, बाथरुममध्ये गेली आणि परत आलीच नाही; 30 वर्षीय गायिकेचा मृत्यू

प्रसिद्ध के-पॉप सिंगर पार्क बो रामचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन(bathroom) झाले आहे. कोरियन स्टार पार्क बो रामच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे.11 एप्रिलच्या रात्री दक्षिण कोरियात पार्क बो रामनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रिपोर्टनुसार, दक्षिण नामयांगजू पोलिसांनी(bathroom) सांगितलं आहे की, पार्क बो-राम ही काल (11 एप्रिल) रात्री तिच्या दोन मित्रांसोबत दारु प्यायली होती. रात्री 9.55 च्या सुमारास ती बाथरूममध्ये गेली, मात्र बराच वेळ झाला तरी ती परत आली नाही. त्यानंतर तिचे मित्र बाथरूममध्ये गेले, तेथे त्यांना पार्क बो-राम ही बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं, त्यावेळी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

पार्क बो-रामच्या मृत्यूची तिच्या XANADU एंटरटेनमेंट एजन्सीने पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं, “पार्क बो रामचे 11 एप्रिल रोजी रात्री अचानक निधन झाल्याची दुःखद बातमी आम्ही शेअर करत आहोत. सर्व कलाकार आणि XANADU एंटरटेनमेंटचे अधिकारी पार्क बो-रामच्या निधनाने अतिशय दु:खी झाले आहेत.पार्क बो-रामच्या सर्व चाहत्यांना ही बातमी अचानक सांगावी लागली हे आणखीनच वेदनादायक आहे.”

पार्क बो-रामने 2010 मध्ये ‘सुपरस्टार के 2’ या सिंगिंग शोमधून करिअरची सुरुवात केली.तिनं 2014 मध्ये ‘ब्यूटीफुल’ या गाण्याद्वारे सोलो डेब्यू केला. पार्कनं ‘प्लीज से समथिंग’, ‘इव्हन डू इट इज अ लाइ’, ‘टू वर्ल्ड्स’, ‘सेलिब्रेटी’, ‘सॉरी’ आणि ‘प्रिटी बे’ सारखी गाणी गायली.

पार्क बो-राम ही सोशल मीडियावर सक्रिय होती. तिच्या गाण्यांची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत होती. तसेच पार्क ही विविध लूकमधील फोटो देखील शेअर करायची. तिला इन्स्टाग्रामवर 175k फॉलोवर्स आहेत.

हेही वाचा :

कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यानं सांगलीचा प्रश्न निर्माण झाला?

Hyundai Grand i10 नवीन व्हर्जनमध्ये लाँच; जबरदस्त लूक आणि दमदार इंजिन

हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं