एसटी बसचालकास पोलिस व त्याच्या पत्नीने दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आसिफ महम्मद कलायगार आणि त्यांची पत्नी हाफिबा आसिफ कलायगार (beat)यांच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास रत्नागिरी महामार्गावरील नावली ता. पन्हाळा येथे घडली आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मलकापूर आगाराची एसटी बस क्र. एमएच ११ – टी ९२८७ घेऊन बसचालक नितीन शिरगावकर हे कोल्हापूरहून मलकापूरकडे रविवारी दुपारी जात होते. यावेळी कलायगार हे पत्नीसह चारचाकी गाडीतून मलकापूरच्या दिशेनेच जात होते. वाघबीळ ता. पन्हाळा पासून एसटी बसचालक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांना पुढे जाण्याची संधी कलायदार यांनी दिली नाही.

अखेर नावली येथे रस्ता रुंद असल्याने बसचालकाने बस पुढे घेऊन, साईड द्यायची नाही का, असे कलायदार यांना विचारले. यावेळी कलायदार दाम्पत्याने बसचालकास शिवीगाळ(beat) व दमदाटी करीत मारहाण केली. हाणामारीदरम्यान कलायदारने बसचालकाला मी पोलिस खात्यात असून तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली.
कलायदार दाम्पत्य बसचालकावर मोठ्या प्रमाणावर अरेरावी करीत असल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. रविवारी याबाबत तक्रार दिली(beat) असता पोलिसांनी कलायदारच्या विरोधात केवळ एनसीआर दाखल केला होता. बस चालकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने सोमवारी दुपारी कोडोली पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा :
रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम
निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा
‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था